...तर हायकोर्टात जाऊ, पुणे व्यापारी महासंघाने दिला ठाकरे सरकारला इशारा

...तर हायकोर्टात जाऊ, पुणे व्यापारी महासंघाने दिला ठाकरे सरकारला इशारा

'अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली एकट्या पुण्यात 15 हजार दुकानं संचारबंदीतही खुली राहणार, मग कोरोना कमी कसा होणार?

  • Share this:

पुणे, 14 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी राज्यात आजपासून लावलेल्या व्यापारबंदीच्या (Maharashtra Lockdown) कठोर निर्णयांविरोधात व्यापारी महासंघानं कोर्टात रीट याचिका दाखल करण्याचे सुतोवाच केले आहे. पुणे (Pune) व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका (Fatehchand Ranka) यांनीच तसे संकेत दिले आहे.

'कोरोना रोखण्यासाठी पूर्ण लॉकडाऊन करायला आमची अजिबात हरकत नाही पण एकीकडे संचारबंदी म्हणायचं आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली निम्या सेवा सुरू ठेवायच्या, अशाने कुठे कोरोना आटोक्यात येणार आहे का? असाही सवाल रांका यांनी सरकारला विचारला. राज्य सरकारने आमच्या मागण्यांवर विचार केला नाहीतर त्या दोन दिवसात हायकोर्टात आव्हान देणार', असा इशाराही  फत्तेचंद रांका यांनी दिला.

IPL 2021: 'कोहलीसारखा कॅप्टन पहिल्यांदाच पाहिला', वाचा गंभीर असं का म्हणाला?

'अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली एकट्या पुण्यात 15 हजार दुकानं संचारबंदीतही खुली राहणार,  मग कोरोना कमी कसा होणार? लॉकडाऊन फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे का? संचारबंदी केली मग शिवथाळी आणि रिक्षाला कशी परवानगी देता? हा दुजाभाव नाही का? कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर पूर्ण लॉकडाऊन केला पाहिजे. पण सरकारने तसं न करता नुसताच घोळ घालून ठेवला आहे, कुणालाच काही समजत नाही', असंही रांका म्हणाले.

सुशांत ड्रग्ज प्रकरणी NCB च्या हाती मोठी माहिती; दुबई कनेक्शनचा उलगडा

गोरगरिबांना मोफत शिवभोजन, फेरीवाल्यांना आर्थिक मदत मग आमच्या कामगारांनी काय केलं. त्यांनाही फेरिवाल्यांप्रमाणेच आर्थिक मदत द्या, ते पण गरीबच आहेत, अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या झूम मिटिंगमध्ये मांडली गेली. राज्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच सरकारी आदेशाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अंतिम निर्णय घेणार असल्याचं रांका यांनी सांगितले.

दरम्यान, आज बऱ्याच दिवसानंतर पुण्यातील कोरोनाचा दैनंदिन आकडा चार हजारांपर्यंत खाली आल्याचं बघायला मिळालं एवढंच नाहीतर बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांंची संख्या अधिक होती. पण बेड्स अभावी आणि उपचारांअभावी वाढत्या मृत्यूसंख्येचा आकडा कसा कमी करायचा. ही चिंतेची बाब आहे.

14 एप्रिल 2021 ची पुणे कोरोना आकडेवारी

दिवसभरात 4206 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4895 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधित 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 20 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहे. सध्या 1158 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 344029 वर पोहोचली आहे.  पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 53326 असून  एकूण मृत रुग्णांची संख्या 5902 वर पोहोचली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 14, 2021, 10:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या