घरफोड्यांचं अर्धशतक, चांदीच्या विटा आणि 5 गाड्यांची चोरी, अखेर पुणे पोलिसांनी दोघांना पकडले

घरफोड्यांचं अर्धशतक, चांदीच्या विटा आणि 5 गाड्यांची चोरी, अखेर पुणे पोलिसांनी दोघांना पकडले

पुणे शहर (Pune) आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली.

  • Share this:

पुणे, 18 नोव्हेंबर : पुणे शहर (Pune) आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांसह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police)अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा आणि 5 चारचाकी गाड्यांसह तब्बल 29 लाख 55 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19), सोहेल जावेद शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन चोरट्यांना ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे शहरात होणाऱ्या वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची माहिती काढण्यात आली. अटक केलेले काही सराईत गुन्हेगार हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे थांबले, असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 50 हून अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली. यातील बारा घरफोड्या उघड झाल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मिठाईचं दुकान उचकटून चोरी करणाऱ्या झुरळ्याला अटक

दरम्यान, मिठाईचं दुकान उचकटून चोरी करणाऱ्या झुरळ्या नावाच्या चोराला समर्थ पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी 24 तासात जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या तडीपार गुंडाचं नाव आकाश उर्फ झुरळया पाटोळे असं आहे. पाटोळे हा तडीपार असून त्याच्यावर खडक व समर्थ पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत.

झुरळ्या याने 15 तारखेला सकाळी 6 वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानांचे शटर उचकटून दुकानातून 48 हजार रुपये रोख रक्कम व मिठाई चोरली होती. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चक्र फिरवली आणि सीसीटीव्हीच्या आधारे झुरळ्याचा शोध घेतला.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading