Home /News /pune /

बायकोचा असाही धाक, घरात झाली 50 लाखांची चोरी सांगितली 5 लाख; हुशार चोरही 5 वर्षांनंतर...

बायकोचा असाही धाक, घरात झाली 50 लाखांची चोरी सांगितली 5 लाख; हुशार चोरही 5 वर्षांनंतर...

5 वर्षांपूर्वी झालेल्या 50 लाखांच्या घरफोडीची नाट्यमयरित्या उकल डेक्कन पोलिसांनी केली आहे. पहिल्या चोरीत मोठे घबाड हाती लागण्याने दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी त्याच घरात शिरले.

पुणे, 11 ऑगस्ट : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होणे ही काही नवी गोष्ट राहिली नाही. घरात भांड्याला भांडे लागणारच. पण, बायकोला राग येऊ नये म्हणून प्रत्येक नवरोबा आपल्या परीने आटोकात प्रयत्न करतो. पुणेकर असलेल्या या नवरोबाने घरात तब्बल 50 लाखांची चोरी झाली फक्त बायकोला राग येऊ नये म्हणून पोलिसांना सांगितलेच नाही. पण म्हणता ना 'कानून के हात लंब होते है' त्यामुळे अखेर चोरांनीच कबुली दिल्यामुळे तब्बल 5 वर्षांनंतर हा प्रताप समोर आला आहे. त्याचे झाले असे की,  5 वर्षांपूर्वी झालेल्या 50 लाखांच्या घरफोडीची नाट्यमयरित्या उकल डेक्कन पोलिसांनी केली आहे. पहिल्या चोरीत मोठे घबाड हाती लागण्याने दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी त्याच घरात शिरलेल्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी चोरीच्या पैशातून दोघा चोरट्यांनी दोन सदनिका, चारचाकी गाडी आणि दागिने खरेदी केल्याचे समोर आले असून, हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोमनाथ बंडू बनसोडे(47,रा, वारजे माळवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे. खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, 6 दिवसांपासून सुरू आहे कोरोनावर उपचार विशेष म्हणजे, ज्या घरात चोरी झाली होती त्या घराच्या मालकाने त्यावेळी केवळ पाच लाखांची चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. दुसऱ्यावेळी हा चोरटा पकडल्यानंतर देखील फिर्यादीने ही माहिती पोलिसांना दिली नाही. चोरट्यांनीच 50 लाखांची चोरी केल्याचे पोलिसांना अनेकदा सांगितल्याने, फिर्यादीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी फिर्यादीने पत्नीला धक्का बसेल म्हणून 50 ऐवजी पाच लाखांचीच फिर्याद नोंदवल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिसांनीही डोक्याला हात लावला. पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता त्याच्या विरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2015 मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसले.  या गुन्ह्यात चोरलेले चार लाख रोख व 1 लाख रुपयांचे दागिने चोरीस गेलेले आढळले. मात्र आरोपी स्वत: 50 लाखाची चोरी केल्याचे सांगत होता. यामुळे दुसऱ्या आरोपीस अटक केल्यावर त्याच्याकडेही चौकशी करण्यात आली. त्यानेही 50 लाखांची चोरी केल्याचे कबुल केले. या तपासात सुधाकर बनसोडेला 50 लाखांपैकी 28 लाख रुपये मिळाले होते. तर आरोपी सोमनाथ बनसोडे याने चोरीत 22 लाख मिळाल्याचे सांगत रोख रक्कमेतून भूगाव येथे एक 1 बीएचके सदनिका घेऊन फर्निचर, ग्रील अशी कामे केली. तर सोन्याचे दागिने मोडल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींची चोरीच्या पैशातून खरेदी केलेली दोन घरे, कार व दुचाकी असा 50 लाखांचा ऐवज आणि तारण ठेवलेले व मोडलेले सोन्याचे दागिने असा 12 लाख 95 हजारांचा ऐवज असा दोन्ही मिळून 62 लाख 95 हजाराचा ऐवज पाच वर्षानंतर हस्तगत करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या