पुण्यातलं पु.ल.देशपांडेंचं घर चोरट्यांनी फोडलं

पुण्यातलं पु.ल.देशपांडेंचं घर चोरट्यांनी फोडलं

मराठी माणसाचे अत्यंत लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातल्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे हा प्रकार घडलाय. सुदैवानं, काहीही चोरीला गेलं नाही.

  • Share this:

19 डिसेंबर : मराठी माणसाचे अत्यंत लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यातल्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे हा प्रकार घडलाय. सुदैवानं, काहीही चोरीला गेलं नाही.

पुण्यातल्या भांडारकर रोडवर मालती माधव नावाची इमारत आहे. तिथे पु. ल. यांचं घर आहे. पण, पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी कुणीच आलं नाही. इमारतीतल्या इतर रहिवाशांचं हे लक्षात आल्यावर पोलिसांना कळवण्यात आलं.

भांडारकर रोडवर मालती माधव या इमारतीत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे रहायला होते.  सध्या तेथे कोणीही राहत नाही़ पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली़ पु ल़ देशपांडे यांचे भाचे दिनेश ठाकूर हे अमेरिकेला असतात. अमेरिकेहून ते आज पहाटे मुंबईला आले व तेथून ते सकाळी पुण्यात दाखल झाले. बंद घर पाहून चोरट्यांनी ते फोडून आत चोरी करण्याचा प्रयत्न केला.

पु. ल. देशपांडे यांच्या निधनानंतर २००९मध्ये त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचे हे घर बंदच असते. बंद घर पाहून यापूर्वी चोरट्यांनी एप्रिल २०१२मध्ये घरात शिरून चोरीचा प्रयत्न केला होता. चोरट्यांनी घरातील पुस्तके अस्ताव्यस्त करुन टाकली. पण, त्यांना काहीही मिळाले नव्हते.

First published: December 19, 2017, 2:08 PM IST

ताज्या बातम्या