सिंहगडावर तरुण चांगला फोटो 'क्लिक' करायला गेला आणि 250 फूट दरीत कोसळला

सिंहगडावर तरुण चांगला फोटो 'क्लिक' करायला गेला आणि 250 फूट दरीत कोसळला

संपूर्ण रात्र तो जखमी अवस्थेत दरीतच पडून होता. दरम्यान त्याने आपल्या नागपूरच्या मित्रांना फोनकरून अपघाताबद्दल कळविले होते पण त्यानंतर ठाकरे बेशुद्ध अवस्थेत गेला.

  • Share this:

पुणे 10 जानेवारी : पर्यटनासाठी किल्ले आणि इतर ठिकाणी जाताना स्मार्टफोनने सेल्फी आणि फोटो घेणं हे तसं सगळ्यांचं आवडतं काम असतं. मात्र फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकदा जीव धोक्यात जातो. सिंहगडावरही चांगला फोटो काढायला गेलेल्या एका तरुण तब्बल 250 फुट दरीत कोसळला. मात्र सुदैवानं गिरीप्रेमींनी केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे तो वाचला.

नागपूर येथील रहिवासी व सध्या पुण्यात टेक महिंद्रा कंपनीत नोकरी करत असलेल्या 28 वर्षीय प्रविण ठाकरे यांचा सिंहगड किल्ल्यावर शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2020 रोजी यशस्वी रेस्क्यु करण्यात गिरिप्रेमीच्या संघाला यश आले.

ठाकरे गुरुवारी दुपारी एकटाच सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. संध्याकाळी सूर्यास्ताचा फोटो घेताना ठाकरे 200-250 फूट दरीत कोसळला. किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागे एमटीडीसी जवळील कड्यावरून तो खाली कोसळला. संपूर्ण रात्र तो जखमी अवस्थेत दरीतच पडून होता. दरम्यान त्याने आपल्या नागपूरच्या मित्रांना फोनकरून अपघाताबद्दल कळविले होते पण त्यानंतर ठाकरे बेशुद्ध अवस्थेत गेल्याने पुढील संपर्क करू शकला नाही.

रोहितला निवडून देण्यासाठी बारामतीकरांनी केलं जीवाचं रान - अजित पवार

त्याचे मित्र सकाळी पुण्यात पोहोचल्यावर सकाळी 10.22 च्या सुमारास एमएमआरसीसीच्या हेल्पलाईनवर रेस्क्यूसाठी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी गिरिप्रेमीची टीम गडावरच कार्यरत होती, त्यांना रेस्क्यूबद्दल कळविण्यात आले. गिरिप्रेमीच्या सिद्धार्थ जाधव, अतुल मुरमुरे, स्थानिक नागरिक सांगळे व नामदेव कोंडके , समृद्धी सपकाळ, नंदू जोरकर, आणि विकास जोरकर या सगळ्यांनी दरीत उतरून ठाकरे यांना सुखरूप गडावर घेऊन आले.

आईने तान्हुलीला रस्त्यावर टाकलं, मात्र वर्दीतल्या मातेनं ह्रदयाशी कवटाळलं

रुग्णवाहिका गडावर उपलब्ध करण्यात आली व सकाळी 11 च्या सुमारास प्रविण ठाकरे यांना आपल्या मित्रांच्या स्वाधीन करून रुग्णवाहिकेत बसविण्यात आले व पुढील उपचारांसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. ठाकरे यांचा हात फ्रॅक्चर असून मणक्याला इजा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शक्य तेवढ्या लवकर मदत पोहोचल्याने ठाकरे यांच्या जीवावरील धोका टळला आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: January 10, 2020, 7:46 PM IST
Tags: pune help

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading