पुण्यात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडात खळबळजनक खुलासा, लहान भाऊच निघाला आरोपी

पुण्यात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडात खळबळजनक खुलासा, लहान भाऊच निघाला आरोपी

पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला असून लहान भावानेच 40 वर्षीय मोठ्या भावाला क्रूरपणे संपवल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 30 जून : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी भर दुपारी एका व्यक्तीचा निर्घुण खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला असून लहान भावानेच 40 वर्षीय मोठ्या भावाला क्रूरपणे संपवल्याची माहिती समोर आली आहे.

संतापाने लहान भावाने लाकडी पलंगाच्या दांडक्याने मोठ्या भावाच्या डोक्यात प्रहार करुन निर्घृण खून केल्याचा गुन्हा बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही खळबळजनक घटना बिबवेवाडी परिसरात वर्धमान सांस्कृतिक केंद्रा समोरील कालिदास जागडे यांच्या मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये शनिवार घडली होती.

याप्रकरणी कविता माखनलाल बेरवा (वय - 28, रा.ओंकारनगर, बिबवेवाडी, पुणे) यांच्या फिर्यादीनुसार बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश खाजप्पा काणेकर (वय 40) असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी लहान भाऊ सुरेश खाजप्पा काणेकर (वय 32) असं बिबवेवाडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

हेही वाचा - धक्कादायक! पेट्रोलिंगला निघालेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा रस्त्यालगत मिळाला मृतदेह

दरम्यान, लॉकडाऊन काळात कमी झालेली गुन्हेगारी लॉकडाऊन शिथिल होताच पुन्हा वाढली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये सतत खून, मारामारी अशा घटना समोर येत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाचं संकट असताना कायदा-सुव्यवस्था टिकवण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 30, 2020, 6:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading