पुणे, 14 ऑगस्ट : पुण्यातील (pune) मावळ (maval) तालुक्यात एक तरुण फाईव्ह स्टार हॉटेल (five star hotel ) समोर चहाची टपरी टाकतो. अभिनेता गोविंदाच्या 'दुल्हे राजा' सिनेमातील दृश्याप्रमाणेच ही घटना आहे. पण, हॉटेलसमोर टपरी टाकली म्हणून तलवारीने वार करून या तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गुन्हेगार कोणता थराला पोहोचतील याचा नेम राहिला नाही. मावळ तालुक्यातील कामशेत इथं राहणाऱ्या उमेश वसंत बालगुडे (वय ३२) याने चहाची टपरी टाकली होती. पण, ही चहाची टपरी मुंढावरे गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल राधे राधे समोर टाकली होती.
आदिवासी महिलांनी बनवलेल्या साबणांना अमेरिकेतून मागणी, पाहा किंमत आणि वैशिष्ट्यं
आपल्या हॉटेलसमोर एक चहाची टपरी टाकली म्हणून हॉटेल चालक सत्येंद्रसिंह प्रेमसिंग चौहान ऊर्फ ठाकूर यांच्या वाद झाला होता. या वादातून सत्येंद्रसिंह याने उमेश बालगुडेवर तलावारीने हल्ला केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश बालगुडे याने टपरी सुरू केल्यानंतर खाण्याचे पदार्थ ठेवले होते. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी आणि उमेश यांच्यात वाद झाला होता. उमेशच्या त्रासाला कंटाळून हॉटेलमधील काही कर्मचारी काम सोडून गेले होते. त्यामुळे सतेंद्रसिंह यांना राग आला होता. त्यातूनच उमेश बालगुडेवर तलवारीने हल्ला करण्यात आला आहे.
मोठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अर्ज
या प्रकरणी उमेश बालगुडेनं कामशेत पोलिसांत (kamshet police) सत्येंद्रसिंह चौहान विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.