COVID-19मुळे झाला पतीचा मृत्यू, दु:खात पत्नीनेही केली आत्महत्या; 2 मुलांच्या आक्रोशाने डोळे पाणावले

COVID-19मुळे झाला पतीचा मृत्यू, दु:खात पत्नीनेही केली आत्महत्या; 2 मुलांच्या आक्रोशाने डोळे पाणावले

आई आणि बाबा दोघेही सोडून गेल्याने मुलांना आता फक्त त्यांच्या आजीचा आधार आहे.

  • Share this:

पुणे 18 सप्टेंबर: कोरोनामुळे सगळ्यांच्या जगण्याचीच दिशा बदलली आहे. अनेक संसार कोलमडून गेले आहेत. आपल्या हक्काची जीवलग माणसे सोडून गेल्याने अनेक कुटूंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यात कोरोनामुळे एका कुटुंबात कर्त्या माणसाचं निधन झालं. पतीच्या मृत्यूमुळे खचलेल्या पत्नीने काही दिवसांमध्ये आत्महत्या केली. त्यांना दोन मुलं असून ती मुलं आता पोरकी झाली आहेत. वडिलांचं अकाली निधन झालं आणि आता आईसुद्धा सोडून गेल्याने या मुलांच्या आक्रोशाने सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.

भोसरी जवळच्या फुलेनगर परिसरात खजुरकर हे कुटुंब राहातं. गुरुबसप्पा आणि त्यांच्या पत्नी गोदावरी हे दोन मुलांसह राहतात. गुरुसप्पा यांचं दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालं. घरचा आधारच गेल्याने गोदावरी या खचल्या होत्या. घरची हालाखिची आर्थिक स्थिती आणि पाठिशी असलेली दोन मुलं यांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला होता.

गुरुसप्पा हे टिव्ही फिटींग, दुरुस्ती अशी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. तेच गेल्याने खचलेल्या गोदावरी यांनी शुक्रवारी (18 सप्टेंबर) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना दोन मुलं असून मुलगा 11 वर्षांचा तर मुलगी 7 वर्षांची आहे. आई आणि बाबा दोघेही सोडून गेल्याने त्यांना आता फक्त त्यांच्या आजीचा आधार आहे.

अन् अजितदादा पोहोचले थेट मेट्रोचालकाच्या केबिनमध्ये, 6 वाजता केली पाहणी, PHOTOS

दरम्यान, राज्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची नोंद योग्य वेळेत करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे मनपाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता पुण्यातील चाचण्यांचा वेग वाढणार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी या योजनेनुसार नागरिकांच्या कोरोनाच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

पुणे तिथे काय उणे, रस्त्यावरील खड्यांबाबत केले असे आंदोलन सगळे पाहतच राहिले!

ज्यात संख्या वाढवाव्या लागणार आहेत. सदयस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या करण्याची मर्यादित क्षमता असल्याने आणि त्यासाठी एनआयव्ही, ससून, आयशर या संस्थावर पुणे महापालिका अवलंबून आहे. त्यामुळे महापालिकाच नव्या मशीन घेण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे रोज चारशे ते पाचशे चाचण्या जास्त होऊ शकतील अशी माहिती पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 18, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या