पुणे, 16 सप्टेंबर : पुण्यात एका जवानाच्या 14 दिवसांच्या बाळाच्या हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या संस्थेत अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून कायमस्वरूपी पेसमेकर बसवून जीवनदान देण्यात आले आहे.
दैनिक दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या संस्थेत भारतीय लष्करातील एका जवानाच्या नवजात बाळाला दाखल करण्यात आले होते. या जन्मताच या बाळाच्या हृदयाच्या ब्लॉकेज होते. त्यामुळे हृदयाचे काम सुरळीत होत नव्हते. तसंच हृदयाच्या स्पंदनाचा वेग हा प्रचंड कमी होता. सुमारे 22 हजार बाळांमध्ये असे बाळ जन्माला येत असते. त्यामुळे ही दुर्मिळ अशीच घटना होती. त्यामुळे जर वेळीच अशा बाळाच्या हृदयाची शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं असते.
पुण्यातील 'या' तालुक्यात देशातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू दराचा टक्का!
कार्डिओ थोरॅसिक सायन्स या संस्थेतील डॉक्टरांनी या बाळाची तपासणी केली आणि तातडी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, अत्यंत गुंतागुंतीची या 14 दिवसाच्या बाळावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. आता या बाळाच्या हृद्यात कायमस्वरूपी पेसमेकर बसवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ही शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक आणि किचकट अशीच असते. बऱ्यात वेळा अशा शस्त्रक्रिया या अपयशी ठरतात. पण तज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत शस्त्रक्रिया तर केलीच आणि बाळाचा जीवही वाचवला.
जया बच्चन यांची शिवसेनेनं केली जोरदार पाठराखण, कंगनाला पुन्हा एकदा फटकारले
आता कायमस्वरूपी पेसमेकर लावल्यामुळे बाळाच्या हृदयाची गती वाढवता आली आहे. कृत्रिम पद्धतीने गती देण्यात वाढवण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी आनंद व्यक्त केला. या बाळाची प्रकृती आता ठणठणीत असून त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे.