• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • हॉटेलमधून बाहेर पडताच सुरू झाला गोळीबार, पुण्यातील गँगवॉरचा LIVE VIDEO

हॉटेलमधून बाहेर पडताच सुरू झाला गोळीबार, पुण्यातील गँगवॉरचा LIVE VIDEO

 लोणीकाळभोर (lonikalbhor) परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली होती.

लोणीकाळभोर (lonikalbhor) परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली होती.

लोणीकाळभोर (lonikalbhor) परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली होती.

  • Share this:
पुणे, 23 ऑक्टोबर : पुणे (pune) जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये गँगवारमधून (gangwar) दिवसाढवळ्या गोळीबाराची (gun firing) घटना घडली होती. दोन टोळ्यांमध्ये भर रस्त्यावर गोळीबार झाला होता. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी 22 ऑक्टोबर रोजी लोणीकाळभोर (lonikalbhor) परिसरातील उरूळी कांचन येथील तळवेडे चौकात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात संतोष जगताप (santosh jagatap) याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉटेल सोनईसमोर ही घटना घडली. संतोष जगताप हा वाळू व्यावसायिक होता. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल सोनईसमोरून जात असताना. त्याचवेळी तिथे पाच जणांनी संतोष जगताप याच्यावर हल्ला चढवला. या हल्लोखोरांनी तीक्ष्ण हत्यारासह हल्ला चढवत गोळीबार केला. यात संतोष जगताप हा गंभीर जखमी झाला. तर त्याचे अंगरक्षकही जखमी झाले. पण जखमी अवस्थेत संतोष जगतापने हल्लेखोरांवर प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला. त्यात एक हल्लेखोर ठार झाला तर बाकीचे हल्लेखोर पळून गेले आहे. संतोष जगताप आणि त्याच्या जखमी अंगरक्षकांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वी संतोष जगताप यांचा मृत्यू झाला होता. दारूच्या नशेत स्थानिकांनी पोलीस कर्मचाऱ्याला केली मारहाण; भयावह घटनेचा Video अप्पा लोंढे गँग आणि त्याच्या विरूद्ध असलेल्या एका टोळीमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती समोर आली. वाळूची ठेकेदारी आणि इतर वादातून हे टोळी युद्ध भडकले होते. या गँगवॉरमध्ये अप्पा लोंढे टोळीतील संतोष जगताप त्याच्यासोबत अजून दोघे होते. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झाला. अद्याप आरोपी फरारी आहेत. परी हरवल्याचा तो एपिसोड पाहून मायराचा भाऊ लागला रडू , Cute VIDEO VIRAL संतोष जगताप याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन २०११ मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत बंधू रमेश सोनवणे यांच्यावर भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर होता. या प्रकरणी जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. त्यानंतर आता संतोष जगताप यांची सुद्धा भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली.
Published by:sachin Salve
First published: