Home /News /pune /

...त्याला पुढे नको जावू सांगितलं होतं, बारामतीतील घटनेचा धक्कादायक VIDEO

...त्याला पुढे नको जावू सांगितलं होतं, बारामतीतील घटनेचा धक्कादायक VIDEO

बारामतीमध्ये 14 ऑक्टोबर रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील सर्व ओढ्यांना पूर आला होता.

बारामती, 16 ऑक्टोबर : परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले आहे. नद्यांना पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोणतेही धाडस करू नका, पाण्याचा प्रवहात जावू नका, असा सल्ला वारंवार प्रशासनाकडून दिला जातो. मात्र, पाण्यात नको ते धाडस एका व्यक्तीच्यावर जीवावर बेतल्याची घटना बारामतीत घडली आहे. बारामतीमध्ये 14 ऑक्टोबर रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे परिसरातील सर्व ओढ्यांना पूर आला होता. सुरक्षारक्षक  विवेक महादेवराव देवधर आपली ड्युटी संपवून घरी जात होते. तेव्हा शहरातील जळोची रोडवर स्मशानभूमी नजीक ओढ्याला भला मोठा पूर आला होता. यावेळी येथे असणारे ग्रामस्थांनी  विवेक देवधर यांना 'आपण पाण्यात मोटरसायकल घालू नका. पाण्याचा प्रवाह व वेग मोठ्या प्रमाणात आहे' अशी माहिती देऊन पुढे न जाण्यास विनंती केली. पण, तरीही विवेक देवधर यांनी नको ते धाडस करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. देवधर यांनी कशाचीही पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात आपली युनिकॉन मोटरसायकल घातली. आपल्याकडे मोठी गाडी आहे, त्यामुळे आपण लगेच पुढे जाऊ असं विवेक देवधर यांना वाटले असावे. पण काही अंतर जाताच पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांची गाडी जागेवरच थांबली. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, दुचाकीसह ते वाहून चालले होते. ओढ्या शेजारीच उभ्या असलेल्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन म़दतीसाठी विवेक देवधर यांच्याकडे दोरी देखील टाकली. परंतु, पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने देवधर हे पाण्याबरोबर वाहून गेले. ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. त्यांच्या मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला पण पावसाचा जोर  वाढल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. अखेर दोन दिवसांनी पाण्याचा जोर ओसरला. त्यानंतर देवधर यांचा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. अखेर आज सकाळी पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना यश आले. देवधर यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकले असते  तर त्यांचा जीव वाचला असता, असं पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Baramati

पुढील बातम्या