S M L

झोपा काढणाऱ्या पोलिसांना चकवा देत ससून रुग्णालयातून कैद्याचे पलायन

झोपा काढणाऱ्या पोलिसांना चकवा देऊन एका कैद्यानं पलायन केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 20, 2018 06:51 PM IST

झोपा काढणाऱ्या पोलिसांना चकवा देत ससून रुग्णालयातून कैद्याचे पलायन

मुंबई, 20 मे : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय...अर्थात सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य. मात्र दुर्जनांवर अंकुश ठेवण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश येताना दिसतं आहे. कारण झोपा काढणाऱ्या पोलिसांना चकवा देऊन एका कैद्यानं पलायन केल्याची घटना घडली आहे.

अक्षय लोणारे असं पळून गेलेल्या कैद्याचं नाव असून तो बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. आरोपीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याचं वेळी पोलिसांना चकवा देऊन आरोपीनं पलायन केलं.

या आधी काही दिवसांपूर्वी पोलीस निद्रावस्थेत असताना कोल्हापूरमधून चार कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली होती. मात्र अशाप्रकारे निष्काळजी करणाऱ्या पोलिसांवर कधी आणि काय कारवाई होणार हाच खरा प्रश्न आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2018 06:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close