चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 22 मार्च : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओशो आश्रमामध्ये पोलिसांनी एका तरुणावर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने गोंधळ घातल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून त्याला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून काही अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला. आधी या अनुयायांना परत जाण्याचं आवाहन करण्यात आलं. पण तणाव आणखी वाढला. त्यातच एक तरुणाने जोरदार घोषणाबाजी करत समोर आला. एवढंच नाहीतर तो पोलिसांवर धावून आल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणावर लाठीचार्ज करत ताब्यात घेतले.
पुण्यात ओशो आश्रमामध्ये जोरदार राडा, पोलिसांनी केला लाठीचार्ज pic.twitter.com/JfM17cBS1A
— News18Lokmat (@News18lokmat) March 22, 2023
मंगळवारी ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा दिली होती. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 20 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माळा घालून जाण्याचा निर्धार अनुयायांनी केला. त्यामुळे वाद झाला.
आज सकाळी आश्रमाच्या आतमध्ये गेल्यानंतर या अनुयायांनी व्यवस्थापनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यामुळे व्यवस्थपकांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. पण परिस्थितीत हाताबाहेर गेली आणि वाद आणखी चिघळला. त्यातच एक तरुण हा समोर आला आणि त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांनी या तरुणावर लाठीचार्ज केला. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मात्र, लाठीचार्ज झाला नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. या आंदोलनादरम्यान, एक अनोळखी इसम अकारण वातावरण गोंधळ घालत होता म्हणून त्याला बळाचा वापर करून ताब्यात घ्यावं लागल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.