पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी

यापुर्वीही न्यूज18 लोकमतने पुण्यातील एकाच सोसायटीतल्या 7 ते 8 जणांना चावा घेतल्याची बातमी दाखवली होती. मात्र पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांच्या वर गेली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांवर, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी

27 मार्च : पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना ताजी असतांनाच पुण्यातही भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढलाय. तरीही पुणे महापालिका याविषयी ठोस उपाययोजना करतांना दिसत नाही. यापुर्वीही न्यूज18 लोकमतने पुण्यातील एकाच सोसायटीतल्या 7 ते 8 जणांना चावा घेतल्याची बातमी दाखवली होती. मात्र पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या 50 हजारांच्या वर गेली आहे.

कुत्र्यांच्या या ऐवढ्या अमाप संख्येतून केवळ ९३८९ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. शिवाय महापालिकेकडे भरीव निधी असूनही या कुत्र्यांना अॅन्टीरेबीजची लस दिली जात नसल्याचा दावा प्राणी मित्र संघटनांकडून करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी मात्र पालिका उपाययोजना करत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात यास्तही भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भटक्या कुत्र्यांच्या गणनेसंदर्भात राज्य पशुसंवर्धन विभागाला विनंती केल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.

पुणे शहरात हॉटेल्स, खाऊगल्य्या, कचरापेट्या, मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आढळतात. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे महारपालिकेने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close