Home /News /pune /

बापरे! पुण्यात Covid-19 रुग्णांची संख्या जाऊ शकते 1 लाखांवर

बापरे! पुण्यात Covid-19 रुग्णांची संख्या जाऊ शकते 1 लाखांवर

10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

10 जूनला हा रेट फक्त 25 एवढाच होता. मात्र महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे हा कालावधी वाढल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे.

पुणे 27 जुलै: महाराष्ट्रात मुंबईनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्यात मोठी वाढ होत आहे. 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात असा अंदाज पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात. सध्याच्या रूग्णवाढीनुसार पुणे मनपाने हा अंदाज व्यक्त केला आहे. बाहेरून येणाऱ्या रूग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखांचा टप्पा करू शकते पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट, त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात गेली साडेचार महिने पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपयेपेक्षा जास्त खर्च करत सर्व यंत्रणा सक्षमपणे चालवली, कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली नाही. परंतु आता राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत द्यावी', अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. पिंपरीमध्ये 4 वर्षाच्या लेकीला आईने जमिनीवर आपटलं आणि चार्जरच्या वायरने.... कोरोना निर्मूलन आढाव्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. महापौर मोहोळ म्हणाले की, 'पुणे शहरात नव्याने तीन जम्बो आयसोलेशन सेंटर उभे करण्यात येणार आहेत. यामध्ये तिन्ही सेंटरमध्ये ऑक्सिजन व आयसीयू बेड्स उभे करण्यात येणार आहेत. पुण्यात पुरंदरमध्ये पाहायला मिळाला निसर्गाचा चमत्कार, पाहा हा VIDEO कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, एसएसपीएमएस ग्राउंड येथे हे नियोजन असून पुढील वीस दिवसात पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. यासाठी एकूण 300 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे त्यात राज्य शासन 50% पुणे महानगरपालिका 25% पिंपरी चिंचवड महानगरपालिका 12.5% आणि पीएमआरडीए 12.5% असा हिस्सा उचलणार आहेत.'
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या