रुग्णवाढीबरोबर पुण्यात कंटेन्मेंट झोनही वाढले, वाचा पूर्ण यादी

रुग्णवाढीबरोबर पुण्यात कंटेन्मेंट झोनही वाढले, वाचा पूर्ण यादी

फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन झाले आहेत. त्याचे एकूण क्षेञफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे.

  • Share this:

पुणे 1 जुलै:  पुण्यातील कोरोना मायक्रोझोनची पुन्हा नव्याने फेरचना जाहीर झाली आहे. पुण्यात याआधी 74 कोरोना प्रतिबंधित झोन होते त्यापैकी 15 मायक्रोझोन कोरोनामुक्त बनल्याने नवीन आदेशातून त्यांची नावं वगळली तर गेल्या 15 दिवसात तब्बल 50 नवे झोन कोरोना बाधित बनलेत तर 9 मायक्रोझोनची फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन झाले आहेत. त्याचे एकूण क्षेञफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी 'न्यूज18 लोकमत'ला ही माहिती दिली.

पुण्यात 877  रुग्णांची वाढ झाली. एका दिवसांमधली सर्वात जास्त वाढ आहे. तर आज 19 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 18105 एवढी झाली आहे.

राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत केवळ धार्मिक स्थळांना काही अटींसह सूट देण्यात आली आहे. कलम 144 चे आदेश जारी करण्याबरोबरच पोलीस आयुक्त प्रणय अशोक म्हणाले की, या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 लागू केले जात असल्याचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी लोकांच्या गर्दीवर बंदी असेल. ते म्हणाले की, विशिष्ट नियमांचे पालन करून धार्मिक स्थळांना सूट देण्यात आली आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

First published: July 1, 2020, 10:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading