मॅनेजर त्रास द्यायचा म्हणून दिली दीड लाखांची सुपारी, गुंडांनी अपघाताचा ड्रामा करून तोडले पाय

मॅनेजर त्रास द्यायचा म्हणून दिली दीड लाखांची सुपारी, गुंडांनी अपघाताचा ड्रामा करून तोडले पाय

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तसंच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली.

  • Share this:

पुणे, 12 ऑगस्ट : कंपनीत मॅनेजर त्रास देतो म्हणून एका तब्बल दीड लाखांची सुपारी देऊन चार गुंडांकडून मॅनेजरवर प्राण घातक हल्ला केल्याची घटना वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले असून एकाला कोरोनाची लागण असल्यामुळे रुग्णालयात हलवले आहे.

30 जुलै रोजी वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत मारुती सुझुकी एस क्रॉस KA 51MK 53 45 मध्ये बसून डोंगशीन कंपनीमधून सीनियर जनरल मॅनेजर मुथया सुबय्या बडेदरा हे घरी जात होते. त्यावेळी वाटेत मोटर सायकलवर आलेल्या दोघांनी गाडीची धडक दिली. त्यानंतर घटनास्थळी आणखी दोघे जण येवून हातात हॉकी स्टिक घेऊन शिवीगाळ दमदाटी करून मॅनेजरला बेदम मारहाण केली. यात त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर करण्यात आले. या प्रकरणी चार अज्ञात इसमवर वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा तपास वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत होते. तसंच दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा असताना पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकास दाखल गुन्ह्याचा तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

आक्षेपार्ह पोस्टमुळे भडकला हिंसाचार, गोळीबारात 2 ठार तर 60 पोलीस जखमी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या गोपनीय बातमीदाराच्या मदतीने तसंच टेक्निकल तपासाचा वापर करून माहिती घेऊन अत्यंत शिताफीने गुन्ह्यातील चारही आरोपींची नावे निष्पन्न केली.

त्यामधील करणकुमार चल्ला मत्तु (वय 23 रा. गांधीनगर देहुरोड, बालाजी रमेश मुदलीयार (वय 27 रा. MB कॅम्प देह रोड), राकेश शिवराम पेरूमल (वय 25 रा. MB कॅम्प देहुरोड) हे आरोपी यांना ताब्यात घेतले असून मुस्ताक जमील शेख (वय 25 रा. गांधीनगर देहुरोड) याला कोरोना  झाले असल्याने व उपचार घेत असल्याने ताब्यात घेण्याची तजवीज ठेवली आहे.

सदर आरोपींची सखोल चौकशी करता चौकशीमध्ये आशिष ओव्हाळ याने आम्हाला दीड लाखाची सुपारी दिली असल्याचे सांगितले. 'मला एक डोण्गशीन कंपनीचा  मॅनेजर त्रास देत आहे तुम्ही त्याला फॅक्चर करा' असे सांगून सुपारी दिली, असल्याची कबुली आरोपींनी दिली.

महाराष्ट्रात ऑपरेशन कमळची तारीख भोंदू डॉक्टराने दिली, सेनेनं उडवली खिल्ली

सदर कारवाई  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा नवनीत कावत , पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,Asi विजय पाटील,हेड कॉन्स्टेबल प्रकाश  वाघमारे,सचिन गायकवाड, गणेश महाडिक  स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: August 12, 2020, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading