कुत्रा जोमात, बिबट्या कोमात, बंगल्यात आला अन् भिंतीवरून उडी टाकून पळाला, LIVE VIDEO

कुत्रा जोमात, बिबट्या कोमात, बंगल्यात आला अन् भिंतीवरून उडी टाकून पळाला, LIVE VIDEO

शिकारीच्या शोधात हा बिबट्या बंगल्यात शिरतो. पण आतमध्ये असलेल्या एक कुत्र्यासोबत त्याचा सामना होतो.

  • Share this:

जुन्नर, 20 जून : पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नरमध्ये (Junner) बिबट्याचा (Leopard)मानवी वस्तीत वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आळेफाटा परिसरात शिकारीसाठी एक बिबट्या बंगल्यात घुसला पण दारात असलेल्या कुत्र्याने (Dog) बिबट्याला चांगलेच पिटाळून लावले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील आळेफाटा  परिसरातील एका बंगल्यातला हा व्हिडीओ आहे. आळेफाटा परिसरात सुरेश गडगे यांची सोसायटी आहे. पुणे नाशिक महमार्गावर धानापुणे सर्व्हिस स्टेशन शेजारी हा बंगला आहे.

बंगल्याच्या आवारात रात्रीच्या वेळी एक बिबट्या शिरला होता. शिकारीच्या शोधात हा बिबट्या बंगल्यात शिरतो. पण आतमध्ये असलेल्या एक कुत्र्यासोबत त्याचा सामना होतो. कुत्रा बिबट्यावर जोरजोरात भुंकू लागतो. कुत्र्याचा प्रतिकार पाहून बिबट्याही मागे हटतो आणि भिंतीवरुन उडी टाकून पळून जातो. बिबट्या शिकारीच्या शोधात आला खरा पण आल्यापावली पळून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये क़ैद झालाय.

नाशिकमध्ये बंगल्यात घुसून कुत्र्याची शिकार

8 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता. एका बिबट्या बंगल्यात शिरला होता. बिबट्यानं एका पाळीव कुत्र्याला आपलं शिकार बनवलं. रात्रीच्या शांतेतत हा बिबट्या घराच्या अंगणात येतो. अंगणात एक पाळीव कुत्रा झोपलेला असल्याचं यात दिसतं. यानंतर बिबट्या लोखंडाच्या कुंपणावरुन घराच्या परिसरात प्रवेश करतो.

यानंतर बिबट्या कुत्र्याच्या दिशेनं पुढे सरकरतो. कुत्र्याला याबाबत काहीही भनक लागलेली नसते. यानंतर कुत्र्याच्या एकदम जवळ जात हा बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो. बिबट्या एका क्षणात या कुत्र्याचा फडशा पाडतो. त्यानंतर  बिबट्या कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून तिथून निघून जातो. व्हिडिओ नाशिकच्या भूसे गावातील एका घरासमोरील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: June 20, 2021, 9:18 AM IST

ताज्या बातम्या