मुलींना झाली कोरोनाची लागण, कुटुंबाने रिपोर्ट बोगस म्हणून पथकाला हाकलले

मुलींना झाली कोरोनाची लागण, कुटुंबाने रिपोर्ट बोगस म्हणून पथकाला हाकलले

संबंधित मुलींच्या नातेवाइकांनी उपचाराकरिता पाठविण्यास मनाई केली.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

देहूरोड, 26 जुलै : पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये एका चाळीत दोन मुलींना कोरोनाची लागण झाली होती. पण, कोरोनाचा रिपोर्ट बनावट असल्याचे सांगून रुग्णालयात भरती होण्यास कुटुंबियांनी विरोध केला. तर दुसरीकडे व्यापऱ्यांनीही दुकानं बंद ठेवण्यास आता नकार दिली आहे.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली  आहे. मागील काही आठवड्याभरातच दुप्पट होणारी रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी  प्रशासन सर्वतोपरीने उपाय योजना राबवत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आजपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 236 वर जाऊन पोहोचली आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

रात्री 12 वाजता HR नं हॉस्टेलवर येऊन धमकावलं, जहांगिर हॉस्पिटल स्टाफ भडकला

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पारसी चाळ या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली असल्याने प्रशासनाने या भागावर आपले अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. येथील दोन मुली कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी संध्याकाळी प्राप्त झाल्यानंतर त्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलगीकरण कक्षात उपचाराकरिता दाखल करण्यासाठी  आरोग्य विभागाचे पथक पारशी चाळ येथे दाखल झाले. पण संबंधित मुलींच्या नातेवाइकांनी रुग्णांना उपचाराकरिता पाठविण्यास मनाई केली. दोन्ही मुलींचा कोरोनाबाधित आल्याचा अहवाल बनावट असल्याचे सांगून आरोग्य विभागाच्या पथकाला दोन वेळा माघारी पाठवले, अशी  माहिती कार्यालय अधीक्षक राजन सावंत यांनी दिली.

मोठी बातमी! सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बॉलीवूडमधील बड्या दिग्दर्शकाची चौकशी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून चार ठिकाणी पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यात आंबेडकर नगर, पारशी चाळ, संकल्प नगरी, आणि चिंचोली या भागांचा समावेश आहे. दाटीवाटीने असणाऱ्या झोपडपट्टी भागात कोरोनाचा फैलाव अधिक जलद गतीने वाढू लागला आहे.

मायक्रो कंटेन्मेंट झोन असून दुकानं बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

तसंच, मायक्रो कंटेन्मेंट झोन असलेल्या भागातील दुकाने कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता बंद करण्यासाठी गेलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करत दुकाने बंद करण्यास नकार दिला आहे.

मागील तीन महिन्यातून अधिक काळात लॉकडाउन सदृश्य परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ असल्याने दुकाने बंद करणार नसल्याचा इशारा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सूर्वे यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला आहे.

राज्यात दोन मुख्यमंत्री एक 'मातोश्री'वर आणि दुसरे.., चंद्रकांत पाटलांचा टोला

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी  शासनाकडून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्याने  कॅन्टोन्मेंट प्रशासन हतबल झाले आहे.  कॅन्टोन्मेंट प्रशासन तसेच व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या खडाजंगीमध्ये वाढत्या कोरोनाचा अटकाव प्रशासन कशाप्रकारे करेल. हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: July 26, 2020, 3:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या