पुणे, 5 जानेवारी : पुणेकरांसाठी (Punekar Good News) एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच संस्थांवर निर्बंध आणले होते. मात्र हळूहळू परिस्थितीत पूर्ववत होत आहे. यातच पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले पर्यटनासाठी खुले होणार आहे.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. आजपासून पुणे जिल्ह्यातील ठिकाणं पर्यटनासाठी खूलं करण्यास मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी कोरोनाचे नियम मात्र पाळावे लागणार आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेताना अधिक सजग राहण्याची गरज आहे. अन्यथा कारवाईला तोंड द्यावे लागू शकते.
कोरोना काळात राज्यातील गड-किल्ल्यांनी कधीही पाहिली नसेल अशी शांतता अनुभवली. गेल्या कित्येक महिन्यांनंतर येथे पुन्हा ट्रेकर्स व पर्यटकांची ये-जा पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप कोरोना गेला नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
एकिकडे देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची (coronavirus new strain) लागण झालेले रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसते आहे. केंद्र सरकारनं देशातील कोरोना रुग्णांबाबत आकडेवारी जारी केली. ही आकडेवारी खूपच दिलासादायक आहे. गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 2.5 लाखांहून कमी झाली आहे. भारतात अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. केंद्र सरकारनं पत्रकार परिषद घेत देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी जारी केली आहे. भारतात सध्या एकूण कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी 44% अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 56% रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं किंवा लक्षणंच नाहीत त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.