Home /News /pune /

पूजा चव्हाण प्रकरणात नव्या व्यक्तीची एण्ट्री, तपासाला कलाटणी मिळणार?

पूजा चव्हाण प्रकरणात नव्या व्यक्तीची एण्ट्री, तपासाला कलाटणी मिळणार?

संजय राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने टीकेची झोड उठली आहे. अशातच आता राठोड यांच्या अडचणी वाढवणारी घडामोड घडली आहे.

पुणे, 25 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case) राज्यभरात मोठी सुरू चर्चा आहे. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Shivsena Leader Sanjay Rathod) यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने सरकार अडचणीत सापडले. मात्र अद्याप संजय राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने टीकेची झोड उठली आहे. अशातच आता राठोड यांच्या अडचणी वाढवणारी घडामोड घडली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पहिला तक्रार अर्ज करण्यात आला आहे. पुण्यात स्वरदा बापट यांनी ही तक्रार केली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून स्वरदा बापट यांनी याप्रकरणी केलेली तक्रार दाखल करून घेण्यात आलेली नाही. ही तक्रार दाखल झाल्यास मंत्री संजय राठोड यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो. कोण आहेत स्वरदा बापट? पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पहिला तक्रार अर्ज करणाऱ्या स्वरदा बापट या भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या सून आहेत. तसंच भाजप युवा मोर्चा पुण्याच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. सांगली महापालिकेत नगरसेवक म्हणूनही स्वरदा बापट यांनी काम पाहिलं आहे. पूजा चव्हाण आत्मेप्रकरणी शासन-प्रशासनाची असंवेदनशीलता? पूजा चव्हाण या टिकटॉक स्टार असलेल्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर अनेक फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यातील बहुतांश फोटोंमध्ये थेट संजय राठोड हे दिसत आहेत. तसंच राठोड हे फोनवरून पूजाच्या संपर्कात असल्याचा दावा ऑडिओ क्लिपमधून करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. हेही वाचा - ज्याची भीती होती तेचं घडलं, संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यानंतर आता कोरोनाचा धुमाकूळ पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कोणावरही कारवाई होताना दिसत नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनीही संजय राठोड यांना तपास पूर्ण होईपर्यंत मंत्रिपदावरून दूर होण्याच्या सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या घटनेबाबत शासन आणि प्रशासन अंसवेदनशील आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात तरी याप्रकरणी काही कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pooja Chavan, Pune, Sanjay rathod, Shivsena, Suicide

पुढील बातम्या