मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

शेतकरी बापाचं कष्ट कमी करण्यासाठी पोराने लढवली शक्कल, स्वत: बनवलेली गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला गिफ्ट

शेतकरी बापाचं कष्ट कमी करण्यासाठी पोराने लढवली शक्कल, स्वत: बनवलेली गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला गिफ्ट

ही गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला मुलगा गिफ्ट देणार आहे.

ही गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला मुलगा गिफ्ट देणार आहे.

ही गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला मुलगा गिफ्ट देणार आहे.

पुणे, 25 ऑक्टोबर : शेतकरी बापाचं कष्ट कमी व्हावेत म्हणून चक्क लेकाने शेतकामासाठी गाडीच बनवली आहे. तसंच ही गाडी दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी बापाला मुलगा गिफ्ट देणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबाडे गावात रहाणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराने ही गाडी तयार केली आहे. ही गाडी शेतात काम करणाऱ्या बापचं कष्ट कमी व्हावं म्हणून प्रसाद खोपडे या मुलाने तयार केली आहे. इंजिन, चाक , स्टेरिंग असं सगळं काही असलेली ही तीन चाकाची गाडी फक्त शेतात काम करण्यासाठी बनवली आहे. ट्रॅक्टर नाही पण ट्रॅक्टर सारखं काहीसं काम करणारी ही गाडी आहे. शेतातून गवताची ओझं, पिके , पाणी नेआण करण्यासाठी या गाडीचा मोठा उपयोग होतो. महत्वाचे म्हणजे अवघ्या 15 हजारात टाकावू वस्तूपासून ही गाडी तयार करण्यात आली आहे. हेही वाचा - दसरा गाजणार Online मेळाव्यांनी, संघ, शिवसेना, भक्ती गड आणि दीक्षाभूमी; नेत्यांचं हायटेक सिमोल्लंघन! शेतात काम करत असताना शेतातील साहित्य,गवत, पिके,तसेच पाणी नेआण करावं लागतं. वडिलांसाठी काहीतरी करावं म्हणून मी ही गाडी बनवली आहे. या गाडीचा फायदा नक्कीच होणार असून यातून वडिलांचं थोडंतरी कष्ट कमी होणार आहे, अशा भावना यावेळी प्रसाद खोपडे याने व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर एका मुलाने आपल्या शेतकरी बापाला दिलेल्या या अनोख्या गिफ्टबाबत परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune news

पुढील बातम्या