मोठी बातमी, 1 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणार

मोठी बातमी, 1 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद होणार

पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

पुणे, 23 डिसेंबर : कोरोनाच्या (Corona) परिस्थितीमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमू नये म्हणून कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. मात्र, 1 जानेवारीला पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद (elgar parishad) होणारच असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा (Koregaon-Bhima)येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती  परिषदेकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर-श्रीगोंदा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे 12 डबे घसरले, PHOTOS

या परिषदेला परवानी देण्यात यावी या मागणीसाठी स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगीचा अर्ज करण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी  झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसंच या प्रकरणाचा NIA कडे तपास देण्यात आला आहे.

कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन  

दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

नव्या वर्षात मोबाइल युजर्सना फटका; प्रीपेड-पोस्टपेड रिचार्ज महागण्याची शक्यता

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Published by: sachin Salve
First published: December 23, 2020, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या