• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • ओ ताई, तुम्ही नादच केला थेट, झिंगाट तरुणीने पुण्याच्या रस्त्यावर लोटांगण घातले 'ग्रेट', LIVE VIDEO

ओ ताई, तुम्ही नादच केला थेट, झिंगाट तरुणीने पुण्याच्या रस्त्यावर लोटांगण घातले 'ग्रेट', LIVE VIDEO

झिंगाट झालेली तरुणी रस्त्यावर धिंगाणा घालत होती. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणीने रस्त्यावर झोपून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरजोरात बडबडत होती.

  • Share this:
पुणे, 04 ऑगस्ट : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. त्याच कारण असं की, एका मद्यधुंद झालेल्या तरुणीने (Drunk girl) पुण्याच्या (pune) रस्त्यावर तुफान धिंगाणा घातला. नुसता धिंगाणाच घातला नाही तर रस्त्यावर वाहतूक सुरू असताना या तरुणीने रस्त्यावर लोटांगण घातले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर(video viral) तुफान व्हायरल झाला आहे. त्याचं झालं असं की, टिळक रस्त्यावरील (hirabaug chowk tilak road pune) हिराबाग चौकात हा प्रकार घडला. एका झिंगाट झालेली तरुणी रस्त्यावर धिंगाणा घालत होती. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणीने रस्त्यावर झोपून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरजोरात बडबडत होती. एवढंच नाहीतर समोरून येणाऱ्या कारचालकाला आपल्या अंगावर गाडी घालण्याची विनंतीची या ताईंनी केली. या तरुणीचा प्रताप पाहून पुणेकर चांगले हैराण झाले. काही तरुण या तरुणीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. तर काही जणांनी या तरुणीला हटवण्याचा प्रयत्न केला. पण, बाई ऐकताल तर ना. मग सजग पुणेकरांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणीची समजूत काढून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पोलिसांचेही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती. अखेर कसंबसं पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
Published by:sachin Salve
First published: