Home /News /pune /

संतापजनक, कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळले; कावळेही आढळले मृतावस्थेत!

संतापजनक, कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळले; कावळेही आढळले मृतावस्थेत!

हा सगळा प्रकार विषप्रयोग करून केला गेला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड, 04 जानेवारी : पिंपरी चिंचवडमध्ये (pimpri chinchwad) काही दिवसांपूर्वी एका पाळीव कुत्र्याला (Dog) इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची अमानुष घटना ताजी असतानाच आता कुत्र्याला पोत्यात टाकून जाळल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरातील पिंपलेगुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार नामक व्यक्तीचा पाळीव कुत्रा बाहेर फिरून घरात आला. तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आला आणि मृत्यू झाला. हे अचानक कसं घडलं हे बघण्यासाठी मुरार यांनी बाहेर शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना एक कुत्रा पोत्यात टाकून जाळल्याचे आढळून आले. तर एका कुत्र्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसले. त्याच बरोबर दोन कावळेही मृत अवस्थेत आढळून आले. कोरोना वॅक्सिनसाठी CoWIN अ‍ॅपवर रजिस्टर करावं लागेल; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस हा सगळा प्रकार विषप्रयोग करून केला गेला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर  पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळाची पाहणी केली. आता दोन्ही कुत्र्यांचं शवविच्छेदन करून त्याचा अहवाल मागवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. शिवसेनेच्या नेत्याने तोडले शिवबंधन, काँग्रेसमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश काही दिवसांपूर्वी  7 महिन्यांच्या कुत्र्याला इमारतीच्या चवथ्या मजल्यावरून फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवड मध्ये घडली होती.  पिंपरी शहरातील पिंपळे गुरव भागातील याच इमारतीच्या टेरिसवरून या भटक्या कुत्र्याला खाली फेकून देण्यात आलं होतं. ही बाब फरिनजहा शेख नामक महिल्याच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केल्या नंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच प्राणीमित्र संघटना आणि खासदार मनेका गांधी यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधत प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची विनंती केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या