अंध व्यक्तीसाठी महिलेनं जे केलं नाही ते कुत्र्याने केलं, VIDEO व्हायरल

अंध व्यक्तीसाठी महिलेनं जे केलं नाही ते कुत्र्याने केलं, VIDEO व्हायरल

मुक्या प्राण्यामधील माणुसकी पाहून सर्वच जण थक्क झाले असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • Share this:

पुणे, 05 जुलै : घराचं रक्षण करणारा कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी. आपल्या मालकावर प्रेम करणार कुत्रा हा नेहमी आपल्या मालकावर येणाऱ्या संकटाची जाणिव करून देणे, वेळप्रसंगी मदतीला धावून येणे, असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण, पुणे पोलीस आयुक्तांनी ट्वीटरवर एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एका  कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक कुत्रा आणि त्याची मालकीन ही रस्त्याने जात होती. तितक्यात समोरून एक अंध व्यक्ती येत असते. मालकीन अंध व्यक्तीच्या चेहऱ्यासमोर हात हलवून पुढे जाते. पण, वाटेत एक लाकडाची काठी आडवी पडलेली असते. कुत्रा आपल्या मालकीनसोबत पुढे गेल्यानंतर लगेच मागे येतो आणि रस्त्यात पडलेला लाकडाची काठी ही तोंडाने पकडून बाजूला ठेवतो. त्याच वेळी अंध व्यक्ती ही पुढे जाते.

अंध व्यक्तीच्या वाटेत अडथळा येऊ नये म्हणून महिलेपेक्षा कुत्र्याने जे काम करून दाखवले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राण्यामधील माणुसकी पाहून सर्वच जण थक्क झाले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. परंतु, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पण, या व्हिडिओतून प्राण्याची माणसांबद्दल असलेली माणुसकी अधोरेखित झाली आहे. अवघ्या 20 सेकंदाचा असलेला हा व्हिडिओ 6.5 लाखांहुन अधिक लोकांनी पाहिला आहे.

संकलन - सचिन साळवे

First published: July 5, 2020, 9:46 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading