Home /News /pune /

मोठी बातमी, 'त्या' निर्णयाचा होणार फेरविचार, बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्ट संकेत

मोठी बातमी, 'त्या' निर्णयाचा होणार फेरविचार, बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्ट संकेत

'तीन सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्याही पक्षांचा विषय नाही. तरीही...'

'तीन सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्याही पक्षांचा विषय नाही. तरीही...'

'तीन सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्याही पक्षांचा विषय नाही. तरीही...'

पुणे, 25 सप्टेंबर : मुंबई (mumbai) वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये (mva government) अजूनही खलबत सुरू आहे. 'तीन सदस्यांचा प्रभाग हा कॅबिनेटचा (cabinet meeting ) निर्णय असून कोणत्याही पक्षांचा विषय नाही तरीही काही मतमतांतरे असतील येत्या बुधवारी यासंदर्भात फेरविचार होऊ शकतो' असे स्पष्ट संकेत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी दिले. महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये तीनचा प्रभाव करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली अशी चर्चा रंगली होती. या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार करणार आहे. त्यातच आता बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, असं स्पष्ट केलं आहे. 'मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग असावा, असा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय कोणत्याही पक्षांचा विषय नाही. तरीही काही मतमतांतरे असतील येत्या बुधवारी यासंदर्भात फेरविचार होऊ शकतो, असं थोरात यांनी स्पष्ट केलं. PM Modi In America : PM मोदींचं अमेरिकेत जोरदार स्वागत तसंच, राज्यावर विजेचं संकट असलं तरी राज्य आम्ही अंधारात जाऊ देणार नाही, आम्ही सक्षम आहोत. विज बीलाची थकबाकी हे वास्तव आहे. त्यामुळे कोळसा खरेदीत अडचणी येत आहेत पण तोही प्रश्न मिटेल, असंही थोरात यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच तीन प्रभाग रचनेबद्दलचा निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही वाद नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery)  हे यावर नक्कीच तोडगा काढतील. प्रभाग 3 चा असावा की 2 चा असावा हे मुख्यमंत्रीच ठरवतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं.

नवा रिसर्च आलाय म्हणे, नेहमी शिव्या देणार्‍यांचे आयुष्य असते इतके जास्त आणि..

त्याचबरोबर, बुधवारच्या कॅबिनेटमध्येच प्रभाग निश्चितीवर अंतिम निर्णय होईल. महाविकास आघाडी सरकारमधील काही घटकांनी वेगळी मतं नोंदवली. त्यावर सीएम सर्वमान्य तोडगा काढतील, आमच्यात कोणतेही वाद नाहीत, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. प्रभाग पद्धतीचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. त्यामुळे भाजपला मिळालेले यश पुन्हा मिळू नये यासाठी दोन सदस्यांची बोर्ड रचना करण्याचा मनसुबा अजित पवारांचा होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी प्रभाग रचनेचा निर्णय रेटून धरला. पण, आता येत्या बुधवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय मागे घेतला जातो का, हे पाहण्याचं ठरणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या