मराठी बातम्या /बातम्या /पुणे /सकाळी गायब झालेली तरुणी, संध्याकाळी विहिरीत सापडली, पुण्यातील खळबळजनक घटना

सकाळी गायब झालेली तरुणी, संध्याकाळी विहिरीत सापडली, पुण्यातील खळबळजनक घटना

साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्याने ती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी असणार्‍या मंचर येथील अकॅडमीसाठी गेली असावी, असा समज झाला.

साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्याने ती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी असणार्‍या मंचर येथील अकॅडमीसाठी गेली असावी, असा समज झाला.

साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्याने ती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी असणार्‍या मंचर येथील अकॅडमीसाठी गेली असावी, असा समज झाला.

पुणे, 16 ऑगस्ट : पुणे (pune) जिल्ह्यातील आंबेगाव (ambegaon) तालुक्यातील कळंब येथील गणेशवाडी शिवारातील विहीरीमध्ये शुभांगी संजय भालेराव (shubhangi bhalerao) या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शेतीचा पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शुभांगीचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडी येथील शेतकरी संजय खंडू भालेराव यांची पत्नी नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी सोमवारी सकाळी निरगुडसर येथे गेली होती. मुलगी शुभांगी ही बबन कोंडाजी भालेराव यांच्या सार्वजनिक हिस्सा असलेल्या विहिरीतून शेती पंपाद्वारे चालू असलेले पाणी बंद करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता गेली. त्यानंतर गणेश वाडी येथे वडील संजय भालेराव हे काही कामानिमित्त गेले.

अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral

साडेअकरा वाजले तरी शुभांगी घरी न आल्याने ती पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासाठी असणार्‍या मंचर येथील अकॅडमीसाठी गेली असावी, असा समज झाला. गावातील स्वप्निल खंडागळे याला तिचा भाऊ शुभमने फोन करून शुभांगी अकॅडमीला आली का? असे विचारले असता स्वप्नीलने सांगितले की, ती आज आली नाही शेजारी वहिनीकडे गेली असावी हे समजून ती बराच वेळ वाट पाहूनही घरी आली नाही. म्हणून आजूबाजूला त्याने शोध घेतला. त्यानंतर स्वप्निल खंडागळे आणि तेथील शेजारी नातेवाईक आणि शुभांगी चा धाकटाभाऊ शुभम यांनी विहिरीकडे जाऊन पाहिले असता विहिरीला पाणी भरपूर असल्याने अंदाज येत नव्हता.

अखेर शेवटी गळ टाकून पाहिले असता गळाला काहीतरी जड लागते असे समजून त्यांनी गळ अधिकच खोलवर सोडला. त्याद्वारे शुभांगीचे कपडे गळाला लागले. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी शुभांगीला विहिरी बाहेर काढले असता ती मृत झाल्याचे दिसून आले. परंतु, तिच्या चेहऱ्यावर, कानाच्या मागे, मानेजवळ आणि हाताच्या दंडाचे लोचके तोडलेले दिसून आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

घ्या आता! स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीतच विसरले खासदार

बहुदा शेती पंप बंद करण्यासाठी विहिरीजवळ असताना अचानकपणे मागून आलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला (leopard attack) करून तिला जखमी केले. ती जीव वाचवण्यासाठी विहिरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, किंवा विजेचा शॉक बसून ती विहिरीत पडली असावी असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे तर वनखाते मात्र अजूनही बिबट्याचा हल्ल्याचा दुजोरा देत नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला की दुसरं काही कारण आहे हे समजू शकेल.

घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी भेट दिली असून शुभांगी भालेराव हिचा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सायंकाळी सहा वाजता पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. तोपर्यंत नेमकी घटना कशी झाली, नेमकी घटना कशामुळे झाली याचा अंदाज लावणे कठीण आहे. अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Pune