पुणे, 08 ऑगस्ट : खेड तालुक्यातील खापरदरा डोंगरावर दोन युवकांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शिरोली जवळच्या आज सकाळी खापदरा डोंगरावर दोन तरुणाचे मृतदेह आढळून आले.राजगुरूनगर पासून जवळ असलेल्या शिरोली येथील खापरदरा डोंगरावर एक गुराखी जनावरे चारण्यासाठी गेला होता तेव्हा माळरानावर दोन तरुणांची हत्या झाल्याचे समोर आले. या दोन्ही तरुणाची ओळख अजून पटलेली नाही. या दोन्ही तरुणावर कोयत्या आणि तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहे. एका तरुणाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर कोयत्याचे अनेक वार केल्याचे आढळून आले आहे.
सासरच्या मंडळीचा प्लॉटवर डोळा, पतीने घोटला पत्नीचा गळा!
तर त्याच्यापासून काही अंतरावर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या हातावर आणि मानेवर कोयत्याचे वार दिसून आले आहे. दोन्ही तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
स्थानिकांनी दोन्ही तरुणाचे मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासह पोलीस टीम घटनास्थळावर दाखल झाली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा ही केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. हत्या झालेल्या दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी सांगितले आहे
8 महिन्यांत 6 जणांशी केलं लग्न, एकाची हत्या; प्रत्येक लग्नाचे मिळायचे 10 हजार
शिरोली येथील थापरदरा माळरानावर हत्या झालेल्या दोन तरुणांसोबत अजून काही व्यक्ती उपस्थित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनास्थळावर धुम्रपान केल्याच्या वस्तू आढळून आल्या आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन तरुणांची हत्या झाल्याने या हत्ये मागचं कारण व हत्या करणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांसमोर आहे. आज सायंकाळी राजगुरूनगर पोलीस आणि खेड उपविभागीय पोलीस अधिकारी याबाबत माहिती देणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.