लघु उद्योजकांकडे जबरदस्तीने मागितली वर्गणी, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 10:36 AM IST

लघु उद्योजकांकडे जबरदस्तीने मागितली वर्गणी, मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा

गोविंद वाकडे, (प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड, 20 ऑगस्ट- लघुउद्योजकांकडे जबरदस्तीने पाच हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या गणपती मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी भोसरी एमआयडीसी येथे घडली. मिळालेली माहिती अशी की, जावेद पठाण नामक तरुण आणि त्याचे दोन साथीदारांनी क्रांतिवीर तरुण मित्र मंडळ ह्या नावाची पावती देत 5000 वर्गणी न दिल्यास बघून घेऊ, अशी धमकी लघु उद्योजक ओंकार हलागौडा यांना दिली. ओंकार यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये दिल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ओझरमध्ये 15 तलवारीसह एकजण ताब्यात..

ओझर (ता.जुन्नर) येथून एकाला 15 तलवारीसह सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमनाथ राजाराम साळुंके (वय 26 वर्षे, रा. धनगरवाडी, ता.जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व ओतूर पोलीस स्टेशन यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन हरिबा मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 15 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपी सोमनाथ साळुंकेवर यापूर्वी गुन्हे दाखल असून तो कारखाना फाट्यावरून ओतूरच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता. तो दुचाकीवर पांढर्‍या गोणीमध्ये 15 तलवारी बांधून निघाला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीवरून ओतूर पोलिसांची मदत घेऊन त्यास ओझर येथे ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) विवेक पाटील, पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) पद्माकर घनवट, ओतूर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक फौजदार विश्वास खरात, सुनील ढगारे, राजु पवार, किरण कुसाळकर, मोसिन शेख या पथकाने केली.

Loading...

VIDEO: नाशिकमध्ये समाजकंटकांकडून वाहनांची जाळपोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...