मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

VIDEO: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'द बर्निंग कार'चा थरार, धावत्या कारने घेतला पेट

VIDEO: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 'द बर्निंग कार'चा थरार, धावत्या कारने घेतला पेट

Car fire at Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारच्या सुमारास एका कारने अचानक पेट घेतला.

  • Published by:  Sunil Desale

अनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 20 मे: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai Pune Express Way)वर आज दुपारच्या सुमारास पुण्या (Pune)हून मुंबई (Mumbai)कडे जाणाऱ्या शेवरोलेट क्रूज कारला (Car) अचानक आग लागल्याची घटना घडली. मुंबईकडे जाताना कामशेत बोगद्याजवळ (Kamshet Tunnel) कारच्या इंजिनमधून धूर येत असल्याची माहिती चालकाला कळताच प्रसंगावधान राखत चालकाने कार सर्विस लेनवर उभी केली आणि पाहिले असता समोरील दर्शनी भागाने अचानक मोठ्या प्रमाणात पेट घेतला (Car caught fire). काही मिनिटातच कार पूर्णपणे जळून राख झाली.

मात्र संबंधित घटना वेळीच लक्षात आल्याने कारमधील एक महिला तसेच दोन पुरुष कारमधून बाहेर पडले. त्यामुळे या सर्वांचे प्राण वाचले आहेत. महामार्ग पोलीस आयआरबी आणि देवदूत यंत्रणा यांच्या जवळपास तासाभराच्या परिश्रमानंतर कारला लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात आली.

Car मध्ये सॅनिटायझर वापरताना लागली आग; 'बर्निंग कार'चा थरार VIDEO मध्ये कैद

अपघाता दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव रोखून धरण्यात आली होती, त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच प्रकारे पुण्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली होती.

First published:

Tags: Car, Fire, Mumbai pune expressway