कोरोना योध्यांना सलाम! मुलगा देतोय मृत्यूशी झुंज, पोलीस जवान मात्र कर्तव्यावर हजर

कोरोना योध्यांना सलाम! मुलगा देतोय मृत्यूशी झुंज, पोलीस जवान मात्र कर्तव्यावर हजर

लाडका मुलगा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असतानाही एक पोलीस जवान कोरोनाच्या लढाईत आपलं कर्तव्य पार पाडतोय.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड 03 मे: कोरोनाचं देशभर थैमान सुरू आहे. डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर राहत कोरोनाचा सामना करत आहेत. अनेक अडी अडचणींचा सामना करत हे लोक आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. डॉक्टर्स तर दिवस रात्र परीश्रम करत लोकांचे जीव वाचवत आहेत. तर घरांमध्ये असलेल्या लोकांचे जीव सुरक्षित राहावेत म्हणून पोलीस धडपडत आहेत. लाडका मुलगा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असतानाही एक पोलीस जवान कोरोनाच्या लढाईत आपलं कर्तव्य पार पाडतोय.

पिंपरी-चिंचवडमध्ये असलेले दत्तात्रय कांबळे यांचा मुलगा सध्या एका असाध्य आजाराशी लढतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून तो हॉस्पिटलमध्ये आहे. कोरोनाचं प्रकरण सुरू झाल्यापासून कांबळे यांना मुलासाठी फार वेळही देत येत नाही. त्यातच इन्फेक्शनचा धोका असल्याने ते फक्त मुलाला पाहतात आणि ड्युटीवर हजर होतात.

त्यांच्या पत्नी मुलाची सर्व काळजी घेत आहेत. त्यांचा एक मुलगाही अशाच आजारात हे जग सोडून गेला. त्याचं दु:ख उराशी बाळगत असतानाच दुसऱ्या मुलालाही तशाच आजाराने ग्रासलं. तुटपुंज्या पगारात घरं चालवणं, दवाखान्याचा खर्च भागवणं अशा धावपळीत असतानाही दत्तात्रय कांबळे आपलं ड्युटीवरचं लक्षं कमी होऊ देत नाहीत.

पुण्यात कोरोनाचे 22 हॉटस्पॉट...पण पालिकेकडून उपाययोजना नाहीत, गंभीर आरोप

आपलं काम हीच पूजा समजून ते अजुनही आपलं कर्तव्य अत्यंत निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांमध्ये मुंबई आणि पुणे देशात आघाडीवर आहेत. रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. देशातल्या अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यूदर कमी कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी उपायोजना केल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर Indian Council of Medical Research म्हणजेच ICMRने पुण्यात प्लाझ्मा थेेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी दिल्याची माहिती राज्य सरकारचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी आज दिली.

जे काम 100वर्षात जमलं नाही ते Lokdownने केलं, पोलीस-पारध्यांचं नातं निर्माण झालं

ते म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी हा काही कोव्हिड-19 वरचा उपाय नाही. मात्र शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्याचा उपयोग कोरोनाविरुद्ध करण्यासाठी जी पद्धत आहे त्यालाच प्लाझ्मा थेरेपी असं म्हटलं जातं.

First published: May 4, 2020, 8:39 AM IST

ताज्या बातम्या