पुणे, 17 जुलै : येरवडा कारागृहातुन पळून गेलेल्या पाच आरोपींपैकी एका आरोपीस पकडण्यात दौंड शहर पोलिसांना यश आलं आहे. गणेश अजिनाथ चव्हाण असं या आरोपीचं नाव असून त्याला दौंड तालुक्यातील लिंगाळी इथं सापळा रचून पाठलाग करत सिने स्टाईलने पकडण्यात आलं आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून 5 कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हे कैदी गज कापून पळून गेल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी फरार झालेल्या कैद्यांची नाव आहेत.
महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद
पुणे शहरातील असणाऱ्या येरवडा जेलमधून गुरुवारी रात्री खिडकीचे गज कापून पाच कैदी फरार झाले होते. या कैद्यांमध्ये देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण, अजिंक्य कांबळे आणि सनी पिंटो यांचा समावेश होता. यातील तिघे दौंड तालुक्यातील असून यांच्यातील एकास पकडण्यात दौंड पोलिसांना यश आलं आहे.
सध्या एका आरोपीस ताब्यात घेतले असून सध्या दौंडमधील कारागृहात ठेवण्यात आले त्याला येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांकडे सुपूर्द करण्यात करण्यात येणार आहे या कारवाई मध्ये दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि त्यांच्या टीमने सिने स्टाईल पाठलाग करून या आरोपीला पकडले.
गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांकडून गाईडलाईन्स जारी, असे आहेत कठोर नियम
या प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून या फरार झालेल्या कैद्यांचा शोध सुरू आहे. हे कैदी गज कापून पळून गेले आहेत. त्यांच्याकडे गज कापण्यासाठी धारदार शस्र कुठून आलं आणि त्यांना कोणी मदत केली का यासंदर्भातही चौकशी केली जाणार आहे.