Home /News /pune /

3 वर्षांच्या चिमुरड्याचा खेळता खेळता विहिरीत गेला तोल, क्षणात झालं होत्याचं नव्हतं...

3 वर्षांच्या चिमुरड्याचा खेळता खेळता विहिरीत गेला तोल, क्षणात झालं होत्याचं नव्हतं...

बारामती, 24 नोव्हेंबर: बऱ्यादा लहान मुलं खेळता-खेळता अनेक उद्योग करतात. त्यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर मोठ्या दुर्घटना घडते, अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील बऱ्हाणपूर (Barhanpur) येथे तीन वर्षाच्या लहान मुलाचा खेळता खेळता तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. अधिराज सागर आहेरकर असं मृत चिमुरड्याचं नाव आहे. अधिराजला विहिरीतून तातडीनं बाहेर काढण्यात आलं पण त्या आधीच त्याने जगाचा निरोप घेतला होता. हेही वाचा...निधी मी आणला पण... पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर साधलं शरसंधान मिळालेली माहिती अशी की, अधिराज अंगणात खेळत होता. तर घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त होती. मात्र, अचानक विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आल्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली. अधिराज कुठे दिसत नाही, हे लक्षात येताच अधिराजचे वडिलांनी विहिरीत उडी घेतली. अधिराज याला बाहेर काढलं. त्यास बारामती शहरातील शासकीय सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी अधिराजवर तातडीनं उपचार सुरू केले. त्याच्या पोटातील पाणी काढून त्याची तपासणी केली असता त्याचे शरीर कसलाच प्रतिसाद देत नव्हतं. अखेर डॉक्टरांनी अधिराजला मृत घोषित केलं. सागरच्या मृत्यूनं बऱ्हाणपूर येथील आहेरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या दुर्दैवी घटनेनं बऱ्हाणपूरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 14 व्या मजल्यावरून चिमुकला खाली कोसळला दरम्यान, अशी एक घटना गेल्या आठवड्यात गाझियाबाद (युपी) येथे घडली होती. आई-वडील घरात नसताना खेळता खेळता 5 वर्षांचा चिमुकला बाल्कनीत आला. त्याला खाली काय चालू आहे हे पाहण्याचं कुतूहल होतं. यासाठी त्यानं आपलं छोटं स्टूल घेतलं त्यावर चढला आणि खाली पाहण्याच्या प्रयत्नात घात झाला. तोल जाऊन 5 वर्षांचा चिमुकला थेट खाली कोसळला. हेही वाचा...मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, भाजप नेत्याचा पोलिस आयुक्तांना फोन 14 व्या मजल्यावरून 5 वर्षांचा चिमुकला खाली कोसळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरातील राजनगर विस्तार क्षेत्रातील पॉश व्हीव्हीआयपी सोसायटीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खाली कोसळलेल्या चिमुकल्याला तिथल्या स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Baramati, Crime news, Pune, Sharad pawar

पुढील बातम्या