Home /News /pune /

TET exam scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, आयएएस अधिकारी अटकेत

TET exam scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, आयएएस अधिकारी अटकेत

मोठी बातमी: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात IAS अधिकाऱ्याला अटक

मोठी बातमी: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात IAS अधिकाऱ्याला अटक

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Police arrest IAS officer Sushil Khodwekar in TET exam scam)

पुणे, 29 जानेवारी : टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात (TET exam scam) नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. आता पुणे पोलिसांच्या सायबर सेलने एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने (Pune Police cyber cell) टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याला अटक (IAS officer arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव सुशील खोडवेकर असे असल्याची माहिती समोर आली आहे. आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Police cyber cell arrest IAS officer from Thane in TET exam scam) पुणे पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी सकाळी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याला टीईटी गैरव्यवहार प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी ठाण्यातून त्याला अटक केली आहे. सुशील खोडवेकर सध्या राज्याच्या कृषी विभागात कार्यरत आहे. अटक करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांनी सुशील खोडवेकर याला न्यायालयात हजर केले आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत खोडवेकर हे शिक्षण विभागात कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या खोडवेकरहे कृषी विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. परीक्षेत अपात्र ठरलेल्या तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन केलं पास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे समोर आले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू आहे. वाचा: TET exam scam: अश्विन कुमारच्या घरी पोलिसांची धाड, तब्बल 25 किलो चांदी अन् 2 किलो सोने जप्त आरोपींकडून कोट्यवधींचं घबाड जप्त टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत मोठं घबाड जप्त केले. टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पोलिसांना मोठं घबाड आढळून आलं आहे. अश्विन कुमार याच्या घरातून 25 किलो चांदी आणि 2 किलो सोन जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या टीमने अश्विन कुमार याच्या बंगळुरू येथील घरी झाडाझडती केली असता हे घबाड सापडलं टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या