मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

TET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण, जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

TET exam scam: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण, जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण, जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण, जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या सौरभ त्रिपाठीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune police detained one more person in TET exam scam case: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पुणे, 22 डिसेंबर : टीईटी परीक्षा घोटाळा (TET exam scam) प्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सौरभ त्रिपाठी असं आहे. सौरभ त्रिपाठी हा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलं आहे. (TET exam scam Pune police detained Saurabh Tripathi from Lucknow Uttar Pradesh) उत्तरप्रदेशातून घेतलं ताब्यात 2018 सालच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी याला ताब्यात घेतलं आहे. सौरभ त्रिपाठी हा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक आहे. त्याने 2018 सालच्या टीईटी परीक्षेच्या निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. टीईटी भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी यापूर्वी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली आहे. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक केली आहे. वाचा : TET परीक्षा घोटाळा: परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे यांना अटक उत्तरप्रदेशातही परीक्षा घोटाळा? सौरभ त्रिपाठी सध्या 'विनर' कंपनीमध्ये कार्यरत आहे. सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे आहे. त्यामुळे विनरच्या उत्तरप्रदेशातील परीक्षाही वादग्रस्त ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीईटी घोटाळा प्रकरणात अटक टीईटी घोटाळा प्रकरणा आतापर्यंत पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर परीक्षा विभागाचा माजी आयुक्त सुखदेव डेरे यांनाही अटक केली. वाचा : म्हाडा भरतीच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर तुकाराम सुपेंवर अखेर राज्य सरकारची कारवाई टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. अखेर राज्य सरकारने धडक कारवाई करत परीक्षा तुकाराम सुपेला निलंबित करण्यात आले आहे. शासनाने महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तुकाराम सुपेला अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तुकाराम सुपेंच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड आरोग्य भरतीनंतर, म्हाडा आणि आता टीईटी पेपरफुटी प्रकरणाने राज्यातील वातावरण तापून निघालं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले आहेत. सुपे यांच्या घरी छापा टाकायच्या आधी पत्नी आणि मेहुण्याने ही रक्कम दुसऱ्या ठिकाणी लपवली होती.
First published:

Tags: Crime, Exam, Pune

पुढील बातम्या