पुण्यात एकाच दिवशी घडले भयंकर, तीन घटना अन् चौघांचा गेला जीव

पुण्यात एकाच दिवशी घडले भयंकर, तीन घटना अन् चौघांचा गेला जीव

ऐन कोरोना काळात जिल्ह्यातील खेड तालुक्यात एकाच दिवशी राजगुरूनगर परिसरात रविवारी तीन वेगवेगळ्या घटना घडल्यात.

  • Share this:

पुणे, 05 ऑक्टोबर : ऐन कोरोना काळात जिल्ह्यातील खेड तालुक्यात एकाच दिवशी राजगुरूनगर परिसरात रविवारी तीन वेगवेगळ्या आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून चाकण येथे एकाचा खून झाला आहे.  यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पहिली घटना राजगुरूनगर शहरात नवरा बायकोची भांडणे टोकाला गेल्याने घडली आहे.  आनंदनगर भागात एका विवाहितेने  नवऱ्यासोबत झालेल्या भांडणातून स्वतःच्या दीड वर्षाच्या मुलीचा गळा घोटून स्वतः देखील आत्महत्या केली आहे. या घटनेत योगिता अमित बागल (वय 32 ) व काव्य अमित बागल (दीड वर्ष ) या दोघींचा मृत्यू झाला आहे.  आठ दिवसांपूर्वी देखील या दोघात भांडणे झाल्याने सदर विवाहितेने सॅनिटायझर पिऊन व तिच्या लहान मुलीला पाजून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

'ती'च्यासोबत व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर मारल्या न्यूड गप्पा,8 तरुणांना आठवले बाप्पा!

दुसऱ्या घटनेत  गोसासी गावात पत्नीशी झालेल्या वादातून पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. चेतन लहू रोडे (राहणार भांबुरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. चेतन रोडे आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वादातून नेहमी भांडणे होत होती. रविवारी सुद्धा किरकोळ कारणातून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात चेतनने गळफास घेऊन आत्महत्या केली.

'पुणे तिथे...'अखेर 6 महिन्यानंतर हॉटेल सुरू, पुणेकरांचे हटके स्वागत, PHOTOS

तिसरी घटना तिन्हेवाडी परिसरात घडली आहे.  घटनेत नवरा बायकोच्या वादातून पूजा पप्पू चौहान (वय 20 राहणार वाळुंज स्थळ, ता. खेड, जि. पुणे) हीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळला आहे.  पोलिसांनी या विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.  पूजा चौहानने आत्महत्या केली हत्या  याचा पोलीस तपास सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 11:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या