अपघाताची पाहणी करणाऱ्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला कंटेनरने चिरडले, पुण्यातला VIDEO

अपघाताची पाहणी करणाऱ्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला कंटेनरने चिरडले, पुण्यातला VIDEO

नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले.

  • Share this:

पुणे, 11 जानेवारी : पुणे बंगळुरू महामार्गावर (Pune Bangalore Highway)आज एकापाठोपाठ चार विचित्र अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.  कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भुमकर पुलावर पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यानंतर काही तासांतच पोलिसांच्या गाडीला (Police van) कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघाताच्या मालिकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे बंगळुरु महामार्गावर आज चौथा अपघात घडला आहे.  नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले. भरधाव कंटेनरने पोलिसांच्या गाडीला जोरात धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, यात पोलिसांच्या महिंद्रा जीपचा पार चुराडा झाला.  तर नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून -मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुरडा झाला असून सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

भुमकर पुलाजवळ विचित अपघातात 3 ठार

तर पहाटे कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकच्या समोरील कॅबिनेटचा चेंदामेंदा झाला आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 1 जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर देखील उलटला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि सिंहगड पोलिस दाखल झाले आहेत. ट्रकमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. अद्याप मृत व्यक्तींची ओळख पटली नसून त्यांचा नाव, पत्ता घेण्याचे काम सुरू आहे.

या परिसरात हा अपघाता झाला असताना काही अंतरावर स्पेअर पार्ट घेऊन जात असलेला एक आयशरला दुसऱ्या एका वाहन घासून गेल्याने उलटा झाला. या अपघात दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल झाली नसल्याचे सांगितले. अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Published by: sachin Salve
First published: January 11, 2021, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading