पुण्यातल्या 10 शिक्षण संस्थांना उघडायचं काश्मीरात कॉलेज!

या आधी अनेक उद्योगपतींनीही काश्मीरमध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर ऑक्टोंबर महिन्यात काश्मीरमध्ये उद्योग परिषद घेण्याची घोषणा सरकारने केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 07:09 PM IST

पुण्यातल्या 10 शिक्षण संस्थांना उघडायचं काश्मीरात कॉलेज!

अव्दैत मेहता, पुणे 20 ऑगस्ट : केंद्र सरकारनं कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये महाविद्यालये सुरू करण्यासाठी पुण्यातील 10 शिक्षण संस्थांनी  तयारी दाखवलीय. यातल्या 7 संस्थांचे लेखी प्रस्तावही तयार झाल्याची माहिती पुढं आलीय. पुढच्या काळात जर सर्व सुरळीत झालं तर 2020च्या जूनमध्ये काश्मीरातल्या शिक्षण संस्थांम्ये प्रवेशही सुरू होण्याची शक्यता आहे.

कलम 370 आणि 35 A हटवल्यनंतर काश्मीरमध्ये शिक्षणसंस्था आणि।महाविद्यालये सुरू करण्यासाठी पावलं पडू लागली आहेत पुण्यातील  Symbiosis,Fergusson,Vishwakarma Institute of Technology,MIT या सारख्या नामांकित संस्थांनी काश्मीरात जाण्याची उत्सुकता दाखवलीय. यापैकी Symbiosis ने तर एक समिती स्थापून त्यावर कामही सुरू केलंय. PPP तत्वावर जर केंद्र सरकारने योजना आणली तर नजीकच्या काळात रोजगार देणारे कोर्सेस सुरू करता येतील आणि हळू हळू कॅम्पस सुरू करून विस्तार करता येईल असं मत Symbiosisच्या प्रधान संचालिका  डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केलंय.

ED आणि CBI करणार कारवाई; या मोठ्या नेत्याला होऊ शकते अटक

खरं तर या आधीही 99 वर्षाच्या कराराने कुणीही काश्मीरात शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आपलं कॅम्पस सुरू करू शकत होतं. मात्र आता 370 हटवल्यानंतर त्याला आणखी गती येणार आहे. सोनमर्ग, पहलगामच नाहीतर पुलवामासारख्या भागातही कॅम्पस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केलीय जातेय.

मात्र जमीन, पैसा, फी यावर भर न देता काश्मीरी लोकांची मने जिंकण्यासाठी प्राधान्य दिलं गेलं पाहिजे असा विश्वास काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी व्यक्त केलाय. सध्या पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये काश्मीरी विद्यार्थी मोठया संख्येने शिकत आहेत. आता काश्मीरातच उच्च शिक्षण उपलब्ध झालं तर शिक्षण आणि रोजगार या दोहोंच्या माध्यमातून विकासाची पहाट उगवल्या शिवाय राहणार नाही असं मतही व्यक्त होतंय.

Loading...

'वंचित' मधल्या मुसलमानांना बोलण्याची मोकळीक - प्रकाश आंबेडकर

या आधी अनेक उद्योगपतींनीही काश्मीरमध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर ऑक्टोंबर महिन्यात काश्मीरमध्ये उद्योग परिषद घेण्याची घोषणा सरकारने केली आहे. काश्मीरात उद्योग वाढला तरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे युवक दहशतवादाकडे न वळता व्यवसायाकडे वळतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...