पिंपरीत बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला, 2 कामगारांचा मृत्यू

पिंपरीत बांधकाम सुरू असलेल्या मंदिराचा स्लॅब कोसळला, 2 कामगारांचा मृत्यू

पिंपळे गुरव गावात मंदिराचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे मंदिरात अनेक कामगार काम करत होते.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 20 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे गुरव येथे एका मंदिराचं सुरू असलेलं बांधकाम खाली कोसळलं. यात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या मंदिराच्या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंपळे गुरव गावात मंदिराचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे मंदिरात अनेक कामगार काम करत होते. अचानक काम सुरू असताना मंदिराचा स्लॅब कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे. तर पोलीस स्लॅब नेमका कसा पडला याचा अधिक तपास करत आहेत. तर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.


एकट्या महिलेने लिफ्टमध्ये जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या