Home /News /pune /

Weather Forecast: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आज याठिकाणी कोसळणार सरी

Weather Forecast: राज्यात ऊन-पावसाचा खेळ, आज याठिकाणी कोसळणार सरी

Latest Weather Update: गेल्या आठवड्यापासून देशाच्या राजधानीसह उत्तर भारतात थंडीची तीव्रता हळूहळू कमी झाली आहे. हिमालयातील काही भाग वगळता उत्तर आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा वाढला आहे.

    पुणे, 19 फेब्रुवारी: मागील काही दिवसात देशाच्या राजधानीसह उत्तर भारतात थंडीची तीव्रता (Cold weather) हळूहळू कमी झाली आहे. हिमालयातील काही भाग वगळता उत्तर आणि मध्य भारतात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा वाढला (Temperature rise) आहे. याचे परिणाम सर्वत्र जाणवू लागले असून याचा  महाराष्ट्रातही उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे तापमान वाढत असलं तरी राज्यावरील अवकाळी पावसाचं (Non Seasonal rainfall) सावट कमी होत नाहीये. आज सकाळपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची (Cloudy weather) नोंद करण्यात आली आहे. येत्या काही तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम वाया गेल्यानं राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहेत. यासोबतच आज उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हेही वाचा-कोरोना संसर्ग दीर्घ काळ राहिल्यास गंभीर धोका, Heart Beat वर होऊ शकतो मोठा परिणाम यासोबतच पुढील चार दिवस दक्षिण कोकणात विविध ठिकाणी ढगाळ ते अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यामुळे विकेंडला सिंधुदुर्ग आणि कोकणात फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या पर्यटकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातल देखील किमान तापमानात 2-3 अंशाची वाढ झाली आहे. येथील तापमान 12 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदलं आहे. हेही वाचा-काय सर्वांना आहे कोरोना व्हॅक्सीनच्या बुस्टर डोसची आवश्यकता? लवकरच होणार निर्णय आज सातारा 15.8, पुणे 14.6, महाबळेश्वर 16, बारामती 16.4, उस्मानाबाद 16.4, चिखलठाणा 15.9 आणि मालेगाव येथे 14 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित महाराष्ट्रात 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. हवामान खात्याने कुठेही इशारा दिला नाही. येत्या काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या