Home /News /pune /

देशात ऊन-पावसाचा खेळ; महाराष्ट्रात तापमान वाढलं, सोलापुरात पारा 38 अंशाजवळ

देशात ऊन-पावसाचा खेळ; महाराष्ट्रात तापमान वाढलं, सोलापुरात पारा 38 अंशाजवळ

Latest Weather Update: आज पुन्हा मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. अन्य ठिकाणी देखील कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे.

    पुणे, 23 फेब्रुवारी: गेल्या आठवड्यात पुण्यासह (Pune) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा (Temperature in Maharashtra) वाढला होता. दरम्यान पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. त्यानंतर पुण्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 3 अंशाची घट नोंदली होती. पण आज पुन्हा मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. अन्य ठिकाणी देखील कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. आज पुण्यात काही ठिकाणी पुन्हा एकदा किमान तापमानाचा पारा 20 अंशाहून अधिक नोंदला गेला आहे. आज वडगावशेरी येथे सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली आहे. येथील किमान तापमान 21.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदल आहे. त्यापाठोपाठ मगरपट्टा (20.6), लवळे 20.2 आणि चिंचवड येथे 20 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. हवमान खात्याने राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाचही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. हेही वाचा-मोठी बातमी: आता 2 ते 6 वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Coronaची लस दुसरीकडे विदर्भात मात्र अनेक ठिकाणी सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला असून तापमान 37 अंशाच्या पार गेलं आहे. आज सोलापुरात सर्वाधिक 37.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर 35.5, नांदेड 34.2, पुणे 35.4, औरंगाबाद 34.6, सांगली 36.9, परभणी 35.3, जेऊर 35, नाशिक 35.4, सातारा 35.1, उस्मानाबाद 34.2, बारामती 34.3 आणि जळगाव याठिकाणी 36.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त उत्तर भारतात मात्र धुकं, थंडी, पाऊस आणि हिमवृष्टी असं संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. येत्या चोवीस तासात जम्मू काश्मीरसह, गीलगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात बहुतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हिमवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यानंतर याठिकाणी पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तर 24 आणि 25 फेब्रुवारी दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या