Home /News /pune /

Weather Forecast: पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात घसरला पारा, येत्या 3 दिवसात याठिकाणी कोसळणार पाऊस

Weather Forecast: पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात घसरला पारा, येत्या 3 दिवसात याठिकाणी कोसळणार पाऊस

Latest Weather Update: काल पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे.

    पुणे, 21 फेब्रुवारी: गेल्या पाच-सहा दिवसांत पुण्यासह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा वाढला होता. काल पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. उन्हाचे चटके सहन केल्यानंतर आज पुण्यासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला (Temperature drop in maharashtra) आहे. आज पुण्यातील एनडीए परिसरात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. तर उर्वरित ठिकाणी देखील पारा 2 ते 3 अंश सेल्सिअसने घसरला आहे. पण येत्या काळात पुन्हा उन्हाचे चटके वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवली आहे. आज पुण्यातील एनडीए याठिकाणी सर्वात कमी किमान नोंदलं असून येथील पारा 9.8 अंशावर पोहोचला होता. तर शिरूर 10.3, हवेली 10.9, पाषाण 11 आणि माळीण येथील 11 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यातील किमान तापमान 11 ते 18.8 च्या दरम्यान नोंदलं गेलं आहे. यासोबतच आज सातारा 14.7, महाबळेश्वर 15.4, जळगाव 11.4, नाशिक 11.3, माळेगाव 14, बारामती 12.9, मुंबई 17.1, जेऊर 14, औरंगाबाद 15.5, अहमदनगर 10.5, उस्मानाबाद 17 आणि नागपूर याठिकाणी 12.4 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे. हेही वाचा-कोरोनाचा नवीन प्रकार Deltacron किती धोकादायक? काय म्हणतायेत भारतीय शास्त्रज्ञ? राज्यात तापमानाचा पारा घसरला असला तरी पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात हवामान खात्याकडून कोणताही  इशारा दिला नाही. काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे. पण कुठेही पावसाचा इशारा देण्यात आला नाही. दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र काही दिवस उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान (IMD rainfall alerts) तयार होत आहे. उद्यापासून पुढील तीन दिवस जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेशात बहुतांशी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तुरळक ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उद्या जम्मू काश्मीर, लडाख, गीलगीट, बाल्टीस्तान आणि मुझफ्फराबाद येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या