Home /News /pune /

राज्यात हाडं गोठवणारी थंडी; पुणेकरांची हवा टाईट, महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ

राज्यात हाडं गोठवणारी थंडी; पुणेकरांची हवा टाईट, महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ

Latest Weather Update: राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका (Cold in maharashtra) वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला (Temperature drop in maharashtra) आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 12 जानेवारी: राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचा जोर (Heavy rainfall) सुरू असताना दुसरीकडे थंडीचा कडाका वाढला (Cold in maharashtra) आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला (Temperature drop in maharashtra) आहे. 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) आणि पाचगणीत हाडं गोठवणारी थंडी पडली आहे. महाबळेश्वरात आज पहाटे तापमानाचा पारा शून्य अंश सेल्सिअसजवळ जावून पोहोचला होता. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठतील अशी स्थिती निर्माण झाली होती. अचानक गारठा वाढल्याने अनेकांनी शेकोटी पेटवून स्वत:चा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ नोंदला गेला आहे. पाचगणीत देखील किमान तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. खरंतर, दरवर्षी डिसेंबर महिन्यात वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठत असतात. पण यावर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडली नाही. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अशात आज पहाटे महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा शून्य अंशाजवळ पोहोचला आहे. त्यामुळे दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली होती. हेही वाचा-मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत अचानक मोठी घसरण,तज्ज्ञांनी सांगितली ही 3 कारणं पण महाबळेश्वरात सुरू असलेल्या वाऱ्यांमुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पण येत्या काळात असंच हवामान कायम राहिलं तर महाबळेश्वरात तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात महाबळेश्वर परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या अफाट असते. पण यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन स्थळांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. वेण्णा लेक येथील बोटिंगही बंद आहे. तर हॉटेल 50 टक्के क्षमतेनं सुरू ठेवली आहेत. केवळ लॉजिंग पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. दुसरीकडे, पुण्यात देखील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात 4 ते 5 अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली आहे. आज पुण्यात राजगुरूनगर याठिकाणी सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येथील तापमान 10.2 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यापाठोपाठ माळीण (10.4), पाषाण  (10.5), हवेली (10.7), एनडीए (11.1), निमगीरी (11.1), शिवाजीनगर (11.2) आणि तळेगाव येथे 11.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात अन्य ठिकाणचं तापमान 11 ते 17 अंशच्या दरम्यान आहे. त्यामुळे पुणेकर कडाक्याच्या थंडीने बेहाल झाले आहेत. पुण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या