पुणे, 28 डिसेंबर : ऑनलाइन कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा तेलंगणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने पुण्यात सुरू असणाऱ्या एका कॉल सेंटरवर छापा टाकत मोठी कारवाई केली.
या ठिकाणाहून पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 100 हून अधिक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत. तसेच अनेक कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या बँक खात्यात लाखो रुपये आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - रुग्णालयातून घरी जाताना 2 मित्रांवर काळाचा घाला, भीषण अपघातात गमावला जीव
हैदराबाद आणि तेलंगणा परिसरात ऑनलाइन लोन देणाऱ्या कंपन्या पोलिसांच्या रडारवर आहेत. ऑनलाइन लोन देण्यासंदर्भातील प्रक्रिया पुण्यातील एका कॉल सेंटरमधून सुरू असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तेलंगणा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांची मदत घेत शनिवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला.
या कारवाई दरम्यान पोलिसांनी एका चिनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.