विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून इंजिनीअर शिक्षकाने केली 'ही' मागणी

विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून इंजिनीअर शिक्षकाने केली 'ही' मागणी

विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

पुणे, 20 ऑगस्ट- विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका इंजिनीअर शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीशी जवळीक साधून तिला लग्नाचीही मागणी घातली होती. संदीप कुमार (वय-35, रा. लोहगाव,) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळ बिहारचा राहणारा आहे.

मिळालेली माहिती अशी की, आरोपी शिक्षक विद्यार्थिनीची घरी जाऊन तिला फिजिक्स विषय शिकवत होता. या दरम्यान त्याने तिच्याशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला. एवढेच नाही तर तिला लग्नाची मागणी घातली. पीडित विद्यार्थिनीने हा प्रकार आईला सांगितला. नंतर विद्यार्थिनीची शिकवणी बंद केली. तरी देखील शिक्षक तिला वारंवार फोन करून त्रास देत होता. तिच्या मोबाइलवर अश्लील मेसेज पाठवू लागल्यानंतर पीडितेने आईच्या मदतीने विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची तातडीने दखल घेत 'जस्ट डाइल'वरून आरोपी संदीप कुमारचा मोबाइल नंबर मिळवला. मोबाइल लोकेशनवरून आरोपीला धानोरी जकात नाका येथून अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) रवींद्र कदम यांनी दिली आहे. आरोपीच्या विरोधात विनयभंग आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी झाली ओळख..

धानोरी परिसरात राहणारी विद्यार्थिनी पुण्यातील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत आहे. ती बारावीला असताना फिजिक्स विषयासाठी खासगी शिकवणीसाठी शिक्षक शोधत होती. शिक्षकाशी संपर्क साधल्यावर त्याने घरी येऊन शिकवणी घेण्याची तयारी दर्शवली. दररोज सायंकाळी आरोपी घरी येऊन विद्यार्थिनीची शिकवणी देत होता. या दरम्यान शिक्षकाने तिच्याशी जवळील साधून एकेदिवशी तिला लग्नाची मागणी घातली. पण, विद्यार्थिनीने त्याला नकार दिला होता.

सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 20, 2019, 4:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading