'परीक्षेत पास व्हायचं असेल तर लॉजवर चल', पुण्याच्या शिक्षकाची घृणास्पद मागणी

परीक्षेत पास व्हायचं असेल तर लॉजवर चल, अशा घृणास्पद भाषेत शिक्षकानं विद्यार्थिनीकडे मागणी केलीये. पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयातला हा प्रकार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 2, 2018 02:02 PM IST

'परीक्षेत पास व्हायचं असेल तर लॉजवर चल', पुण्याच्या शिक्षकाची घृणास्पद मागणी

02 मे : समाजात महिलांविरोधातली विकृती किती खोलवर गेलीये, याचा प्रत्यय दुर्दैवानं आता दररोज यायला लागला आहे. परीक्षेत पास व्हायचं असेल तर लॉजवर चल, अशा घृणास्पद भाषेत शिक्षकानं विद्यार्थिनीकडे मागणी केलीये. पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयातला हा प्रकार आहे.

या विकृत शिक्षकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलीची ओळख पटू नये म्हणून आम्ही महाविद्यालय आणि आरोपी शिक्षकाचं नाव सांगत नाहीये. आणि मुलीनं रेकॉर्ड केलेली ऑडियो क्लिपही ऐकवत नाहीये.

परीक्षते पास होण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणं, हे प्रकार समाजात वाढत चाललेत. त्यामुळे निदान शाळा आणि कॉलेजमध्ये मुली सुरक्षित असतात, असा एक समज पूर्वी असायचा. पण आता ज्ञानाच्या मंदिरातही मुलींसोबत हे प्रकार राजरोसपणे सुरू झालेत.

या घटनेमुळे महाविद्यालयात तुमचे मुलं खरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. पीडित विद्यार्थीनीकडे शरीर संबंधाची मागणी करणाऱ्या शिक्षका विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोरधरू लागली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close