पिंपरीत शिक्षिकेची 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, शिक्षिकेला अटक

तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला भाग्यश्री पिल्ले या शिक्षिकेने एका लाकडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना,पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय. त्यामुळे चिमुकल्याची दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली असून , त्याला कायमच अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली जातीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2017 12:31 PM IST

पिंपरीत शिक्षिकेची 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण, शिक्षिकेला अटक

गोविंद वाकडे, पिंपरी, 14 सप्टेंबर : तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाला भाग्यश्री पिल्ले या शिक्षिकेने एका लाकडी पट्टीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना,पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलीय. शिक्षिकेने केलेली मारहाण एवढी जबरदस्त होती की,त्यामुळे चिमुकल्याची दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली असून , त्याला कायमच अंधत्व येण्याची शक्यता वर्तवली जातीय.

अडीच तीन वर्षांच्या या मुलाची अवस्था पाहा. त्याचा चेहरा सुजलाय. कुणीतरी अतिशय अमानुषपणे त्याला मारहाण केल्याचं स्पष्ट दिसतंय. पिंपरी शहरातल्या भाऊनगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबानं आपल्या एकुलत्या एका मुलाला खासगी शिकवणी लावली होती. तिथल्या शिक्षिकेनंच मारहाण केल्याचा पालकांचा आरोप आहे.

गंभीर बाब म्हणजे पोलिसांनी तक्रारीला सुरुवातीला दाद दिली नसल्याचा आरोप आईवडिलांनी केलाय. त्यानंतर या भागातल्या डीसीपींनी संबंधित मुलाचं घर गाठलं आणि मुलाच्या आईवडिलांना पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार नोंदवून घेतली.

अतिशय गंभीर आणि चीड आणणारी अशी ही घटना आहे. कोवळ्या वयातल्या मुलाला बेदम मारहाण करण्याएवढी क्रूरता येते कशी, हा प्रश्न कुणाही सर्वसामान्य माणसाला पडावा. अशा प्रवृत्तीच्या लोकांना कडक शिक्षा व्हायला हवीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 11:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...