निवडणूक अधिकाऱ्याचा दणका, पंढरपुरात भाजप खासदारावर गुन्हा दाखल

निवडणूक अधिकाऱ्याचा दणका, पंढरपुरात भाजप खासदारावर गुन्हा दाखल

जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 03 डिसेंबर : पंढरपूर शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या (teacher and graduate constituency election 2020) मतदानाच्या वेळी मतदान केंद्रात जाणे भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी (BJP MP Jai Siddheshwar Swami) यांना चांगलेच महागात पडले आहे. जय सिद्धेश्वर स्वामी  यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक निवडणूक अधिकारी अनिकेत मानोरकर यांनी गुरुवारी संध्याकाळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात गुन्हा  दाखल केला आहे.  भादवि कलम 171 फ आणि 188 अन्वये  गुन्हा दाखल झाला आहे.

शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना खासदार जय सिद्धेश्वर महाराजांनी मतदान केंद्रांमध्ये थेट प्रवेश केला होता. त्यामुळे  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची खासदार  सिद्धेश्वर महाराजांविरुद्ध पुन्हा दाखल करण्याची मागणी  केली होती. पंढरपूरच्या  कवठेकर प्रशाला येतील 430 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ही घटना घडली होती. त्यामुळे  खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली होती.

दरम्यान, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पंढरपूर तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी 63.72 टक्के मतदान झाले तर शिक्षक मतदारसंघात 89,72 टक्के मतदान झाले आहे. आज मतमोजणी होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा पहिल्यांदाच थेट सामना या निवडणुकीत रंगला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन्ही पाटलांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहे. मनसेनेदेखील उमेदवार देत या सामन्यात चुरस निर्माण केली आहे. तर शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जयंत आसगावकर तर भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे रिंगणात आहेत. यापूर्वी अशा निवडणुकांत प्रामुख्याने शहरी भागातच प्रचाराचा जोर असायचा. यंदा मात्र ग्रामीण भागातही प्रचाराचा धुराळा उडाला आहे. प्रत्येक तालुक्यात प्रचारसभा घेतल्या गेल्या. तसेच मोबाइल, सोशल मीडियातून मेसेज आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 8:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या