मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, टँकरची ट्रॅव्हलरला धडक; 2 ठार

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, टँकरची ट्रॅव्हलरला धडक; 2 ठार

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, टँकरची ट्रॅव्हलरला धडक; 3 ठार

पुण्यात नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात, टँकरची ट्रॅव्हलरला धडक; 3 ठार

पुण्यातील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. एका भरधाव टँकरने (tanker) ट्रॅव्हलर (traveler) ला जोराची धडक दिली.

पुणे, 22 ऑक्टोबर : पुण्यातील नवले पुलावर ( Navale Bridge Accident pune) पुन्हा एकदा अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) आज पुन्हा एक भीषण अपघात झाला असून यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारीच या ठिकाणी अपघात झाला होता. अवघ्या 12 तासात पुन्हा याच ठिकाणी हा दुसरा अपघात झाला आहे. पुण्यातील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी रात्री एका भरधाव टँकरने (tanker) ट्रॅव्हलर (traveler) मिनी बसला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हलर गाडी पलटी होऊन सर्व्हिस रोडवर जाऊन आदळली. यावेळी सेल्फी गार्डनमध्ये बसलेले काही जण जखमी झाले आहे. आवडता शर्ट घातला नाही म्हणून पत्नी रागावली; पतीला आला तिच्या मृत्यूचा कॉल या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवलं. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहे. यात दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळावरून दोन्ही वाहनं बाजूला करण्यात आली आहे. दिवाळीत अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं! कसं? वाचा सविस्तर नवले पुलाजवळ याआधीही विचित्र अपघात झाले होते. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. तीव्र उतारामुळे अनेकदा अवजड वाहनाच्या चालकाचा ताबा सुटून भीषण अपघात या भागात झालेले आहेत. सतत होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर येत असतात. त्यामुळे देहूरोडपासून दरी पुलापर्यंत या रस्त्यावर रुंदीकरण करणे, बायपास करणे, या सारख्या कामांची मागणी स्थानिक प्रतिनिधी करत आहेत.
First published:

पुढील बातम्या